Saturday, May 30, 2026
PUNE

भाजप सहकार आघाडीच्या कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्‌घाटन

पुणे दि.2 – भारतीय जनता पार्टी , सहकार आघाडी पुणे शहर वतीने ” मोफत कायदेशीर सल्ला केंद्र “ चे ऊदघाटन भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांचे हस्ते भाजपा शहर कार्यालय , सन्मान हॅाटेल , पुणे येथे करण्यात आले . कार्यक्रमाचे संयोजन भाजपा सहकार आघाडी पुणे शहर अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी केले .

सर्वसामान्य पुणेकरांसाठी दर महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मोफत कायदेशीर सल्ला केंद्र सुरू करण्यात आले आहे. मान्यवर अभ्यासू कायदेपंडीतांचे मार्गदर्शन गृहरचना सोसायट्या, नागरी पतसंस्था, सहकारी बॅका यासोबत कौटुंबिक आणि इतर योग्य विषयावर मोफत सल्ला दिला जाणार आहे. पुणे शहरात गृहनिर्माण संस्था ह्या १७९८४ इतक्या असुन फक्त २४८२ संस्थांनी डीम्ड कन्व्हेअन्स करून घेतले आहे. २१२५ गृहरचना संस्थाना डीम्ड कन्व्हेअन्स लागु होत नसले तरी बाकी ब-याच हजार संस्थांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि या साठी भाजपा सहकार आघाडी मदत करेल. पुणेकरांनी या समाजोपयोगी उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जगदिश मुळीक यांनी केले आहे. दर महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भारतीय जनता पार्टी, पुणे शहर कार्यालय येथे हे मोफत कायदेशीर सल्ला केंद्र चालणार आहे. यासाठी सहकार आघाडी पुणे शहर यांनी तयार केलेल्या लिंकवर आपल्याला आपल्या संस्थेची अथवा वैयक्तिक माहिती , अडचणी यांची माहिती पाठवायची आहे . ती लिंक सोशलमिडीयाच्या विविध माध्यमातुन पुणेकरांपर्यत पोहचविणार असल्याचे अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी सांगितले.

https://surveyheart.com/form/6016afdc95ad364d0c2e51d0

याप्रसंगी भाजपा पुणे शहर संघटन मंत्री रवि अनासपुरे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्यासह नगरसेवक, शहर पदाधिकारी, सहकार आघाडीचे पदाधिकारी आणि विविध आघाडयांचे अध्यक्ष उपस्थित होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading