राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा जागर होणे ही काळाची गरज

पुणे – “निष्कलक चारित्र्य कसे असावे हे शिवशंभु चरित्रातून दिसुन येतं. ही राजमाता जिजाऊची शिकवण होती. ही जिवनमूल्य आपल्या युवा पिढी मध्ये निर्माण व्हावी यासाठी जिजाऊ च्या विचारांचा जागर समाजामध्ये होत राहिला पाहिजे हीच खरी काळाची गरज आहे. आपण सर्वांनी राजमाता जिजाऊ यांचे चरित्राचे आध्यायन करावे त्यामुळे प्रत्येकात देशाविषयी अभिमान निर्माण होईल.” असा आशावाद शिवशंभू व्याख्याते तसेच ‘हिंदू जागरण मंच’ चे पुणे महानगर प्रमुख निलेश रमेश भिसे यांनी व्यक्त केला.

‘राजे शिवराय प्रतिष्ठान’ यांच्यावतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन संत तुकाराम मंगल कार्यालय, सुसरोड (पेठ जिजापूर) पाषाण येथे करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प.श्री सोमनाथ पाडाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे विभाग प्रमुख दत्तात्रय कळमकर, राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश पवळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी कोरोना योध्यांना त्यांनी केलेल्या कोव्हिड काळात केलेल्या कार्यासाठी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी महेश पवळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेवून राजे शिवराय प्रतिष्ठान विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असते. राजमाता जिजाऊ यांच्या विचारांनी देशप्रेमाचा जागर व्हावा या उद्देशाने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश पवळे, सूत्रसंचालन हर्षल तापकीर यांनी तर मंगेश निम्हन यांनी आभार व्यक्त केले. सनी येळवंडे , ओंकार निम्हण , अक्षय भेगडे , अभिषेक पानसरे , अजिंक्य सुतार , शुभम कुंभार , अनिकेत कुंभार यांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. मातरम् होवून कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: