हास्यजत्रेचे पडद्यामागील हास्यजादूगार येणार मंचावर

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेली दोन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हास्यजत्राने प्रेक्षकांच्याही मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. या सर्व स्किट्स मागे अनेकांची मेहनत आणि कष्ट असतात लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ असे अनेक लोक या मागे मेहनत घेत असतात. स्किट्सच्या माध्यमातून कलाकार बऱ्याचदा त्यांचा उल्लेख देखील करतात. अशीच दोन नाव म्हणजे हास्यजत्रेचे पडद्यामागील हास्यजादूगार सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी ही लेखक-दिग्दर्शकाची जोडी गेला एक दशकभर प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. सोनी मराठीसाठी या जोडीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची निर्मिती केली आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत झाला.

येत्या आठवड्यात पडद्यामागील हे हास्यजादूगार सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी मंचावर एक स्किट सादर करणार आहेत. सर्व कलाकार या सादरीकरणाने खूपच आनंदी आहेत आणि हा एपिसोड बघण्यासाठी उत्सुकही आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: