नादब्रह्म पथक ट्रस्टतर्फे श्रीराम मंदिराला ५४ हजारांचा निधी

पुणे, दि. 2 – गणेशोत्सवातील ढोल-ताशा वादनाकरीता केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणा-या पुण्यातील नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्टतर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीकरीता ५४ हजार रुपयांचा निधी देण्यात आला. मोतिबाग नगर येथे रा.स्व.संघांच्या पदाधिका-यांनी हा निधी स्विकारला. 


यावेळी रा.स्व.संघाचे कसबा भाग संघचालक अ‍ॅड.प्रशांत यादव, मोतिबाग नगर संघचालक शरद चंद्रचूड, किरण देशपांडे, अभिजीत केळकर, अरविंद रावेतकर, परेश देवळणकर, भाजपा युवा मोर्चा पुणे शहर सरचिटणीस सुनील मिश्रा, युवा मोर्चा ओबीसी आघाडी पुणे शहराध्यक्ष तुषार रायकर आदी उपस्थित होते. पथकाचे विश्वस्त कमलेश कामठे, सचिव आनंद खंडेलवाल, कुशल मोडक, माऊली कामठे यांनी निधीचा धनादेश सुपूर्द केला. 


पथकाचे सचिव आनंद खंडेलवाल म्हणाले, नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट केवळ वादनापुरते मर्यादित नाही. वर्षभरात पर्यावरण, आरोग्य आणि स्वच्छतेच्या अनुषंघाने विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच समाजातील उल्लेखनीय कार्य करणा-यांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहित केले जाते.अयोध्येतील राम मंदिर उभारणीकरीता पथकातील वादकांनी एकत्रितपणे हा निधी देण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

%d bloggers like this: