प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान पाहून देश दुःखी झाला – पंतप्रधान

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर पहिल्यांदाच भाष्य केले. शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्लावर झालेल्या घटनेबाबात प्रतिक्रिया देत ‘दिल्लीत २६ जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान पाहून संपूर्ण देश दुःखी झाला’, असे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.

आज 73व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी ‘लाल किल्ल्यावर झालेल्या तिरंग्याच्या अपमानावर भाष्य केले. 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. त्यानंतर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची शानदार परेडही पाहिली. या महिन्यात क्रिकेट जगातूनही चांगली बातमी आली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरिज जिंकली. आपल्या खेळाडूंची मेहनत आणि टीमवर्क सर्वांनाच प्रेरणादायी आहे’, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील घटनेकडेही देशावासियांचे लक्ष वेधले. याच दरम्यान दिल्लीत 26 जानेवारीच्या दिवशी तिरंग्याचा अपमान पाहिला. त्यामुळे देश दुःखी झाला, असे त्यांनी म्हटले.

त्याचबरोबर ‘आपल्याला येणाऱ्या काळाला नवीन आशा व नाविन्याने भरायचे आहे. आपण मागील वर्षी असाधारण संयम व धैर्याचा परिचय दिला. या वर्षातदेखील कठोर मेहनत घेऊन आपल्याला संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपल्या देशाला अधिक गतीने पुढे न्यायचे आहे. असेदेखील मोदी यावेळी म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: