विज्ञान संकल्पनेवर डिझाईन स्पर्धेचे आयोजन

पुणे, दि. ३१ – ‘पै कॉलेज ऑफ वेदा’ तर्फे ‘सायन्सीफाय२०२१’ या विज्ञान संकल्पनेवर डिझाईन मॉडेल चॅलेंज, तसेच विज्ञान कथा कथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आविष्कार इंडिया, डी.आय. वाय. सायन्स, रोबोटिक्स ट्रेनिंग कंपनी यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली आहे.

पाचवी ते सातवी, सातवी ते दहावी तसेच खुल्या गटात होणाऱ्या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १४ फेबुवारी पर्यंत सहभाग घेता येईल.

स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळयात २७ फेब्रुवारी रोजी ‘ गणित मित्र ‘, ‘ विज्ञान मित्र ‘ पुरस्कार दिले जाणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: