सीरम घेऊन येत आहे ‘कोव्हिशील्ड’ पाठोपाठ ‘कोवावॅक्स’

जूनपर्यंत सीरम आणणार करोनावरची आणखी एक लस

पुणे, दि. ३० – ‘कोव्हिशील्ड’ या करोनावरील लासीच्या पाठोपाठ आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ‘कोवावॅक्स’ ही आणखी एक लस जूनपर्यंत बाजारात घेऊन येत आहे. सीरमकडून नोव्हावॅक्स कंपनीच्या सहकार्याने ही लस भारतात लॉन्च् केली जाणार आहे. नोव्हावॅक्सची लस फेज III च्या चाचण्यांमध्ये प्रभावी असल्याचे दिसून आले असून सीरमने कोविड 19 लसीच्या स्थानिक मानवी चाचणीसाठी अर्ज केला आहे, अशी माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अदार पूनावाला यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

ब्रिटनमध्ये मानवी चाचण्या दरम्यान नोव्हावॅक्सची लस 89.3 टक्के सुरक्षित असल्याचे आढळले. त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांना देशांतर्गत पातळीवर मानवी चाचण्या घेण्यासंदर्भात अर्ज देण्यात आला आहे. कंपनीला आशा आहे की नोव्हावाक्स लसीच्या चाचणीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. नोव्हावॅक्स लसीची फेज III ची मानवी चाचणी 15 हजार व्होलॅन्टियर्सवर घेण्यात आली आहे. या चाचणीत सहभागी होणाऱ्यांमध्ये 18 ते 84 वय वर्ष असलेल्या स्वयंसेवकांचा समावेश होता. ही लस प्रभावी ठरल्यानंतर कंपनीला यूके, युरोपियन युनियन आणि इतर देशांतही अर्ज करणार आहे, अशीही माहिती पूनावाला यांनी दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: