गिरीश प्रभुणेंना महापालिकेची मालमत्ता जप्तीची नोटीस

पिंपरी, दि. ३० – नुकत्याच केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना पिंपरी चिंडवड महापालिकेने मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवली आहे. त्यांच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या संस्थेला एक कोटी 86 लाखांचा कर थकल्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. विशेष म्हणजे केंद्रात आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रभुणे यांच्या संस्थेचे बांधकाम २००० चौरस फुटाच्या पूढे असल्याने त्यांना मालमत्ता कर हा शासनाच्या नियमाप्रमाणे दुपटीने लागला आहे. सदर शैक्षणिक ही खूप जुनी असल्याने नवीन नियमाप्रमाणे ब्लु लाईनच्या आत आली आहे असे असल्याने सदर संस्थेचे बांधकाम अधिकृत होऊ शकत नाही. यामुळे सर्वसामान्यांना ५०००  अनधिकृत बांधकामांना ज्याप्रकारे  नोटीस दिली गेली आहे त्यातील सदर नोटीस आहे.  त्याचप्रमाणे आर्थिक वर्ष संपत असल्याने मालमत्ता काराबाबत नोटीस दिली असल्याचे पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी सांगितले. दरम्यान , 21 जानेवारीला  महापालिकेडून ही नोटीस पाठवण्यात आली होती आणि त्यानंतर 25 जानेवारीला प्रभुणे यांना पद्मश्री जाहीर झाला होता. 

दरम्यान, याची माहिती मिळताच महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रवण हर्डीकर यांना संपर्क करुन  माहिती घेतली. तसेच याबाबत तात्काळ तोडगा काढण्यासाठी आयुक्तांना निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी दिला आहेत. याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी श्री प्रभुणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली आणि मालमत्ता जप्तीची कोणत्याही प्रकारची कारवाई पिंपरी चिंचवड मनपा काढून होणार नाही असे आश्वासन देखील दिले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: