हुतात्मा दिनी अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

नवी दिल्ली, दि. ३० – आज हुतात्मा दिनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एका उद्यानातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. काही समाजकंटकांकडून हे कृत्य करण्यात आले असून भारतीयांसह अमेरिकेतील नांगरिकांनीही या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. उत्तर कॅलिफोर्नियाच्या डेव्हिस सिटीतील सेंट्रल पार्कमधील महात्मा गांधीजींचा हा 6 फूट उंच आणि 294 किलो वजनाचा कांस्य पुतळा बसवण्यात आला होता. कालच्या घटनेत या पुतळ्याचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त येथील स्थानिक प्रसार माध्यम डेव्हिस इंटरप्राइस यांनी दिले आहे.

वाशिंग्टन डी. सी. मधील भारताच्या दूतावासाने या प्रकरणी गंभीर चौकशी आणि तपास केला जावा अशी मागणी केली आहे. शिवाय या अत्यंत नींदनीय कामासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जावी, अशी देखील मागणी केली जात आहे. सॅन फ्रांसिस्कोमध्ये देखील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने डेव्हिस शहर आणि स्थानिक कायदे अंमलबजावणी अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा मांडला असल्याचे हे वृत्तात म्हटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: