श्रीमंत थोरले नानासाहेब पेशव्यांच्या ३०० व्या जयंती वर्षास साते गावात उत्साहात प्रारंभ

पुणे, दि. २९ – हिंदवी स्वराज्याचे २१ वर्षे पंतप्रधानपद भूषविणा-या श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांच्या ३०० व्या जयंती वर्षाला त्यांच्या वडगाव मावळ येथील साते या जन्मगावी उत्साहात प्रारंभ झाला. पुणे शहरातील विविध मान्यवरांसह साते गावातील ग्रामस्थांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. 

श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचा जन्म ६ डिसेंबर १७२१ रोजी साते या गावात झाला. त्यानिमित्ताने हिंदवी स्वराज्य महासंघाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची आणि पुण्यातील श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती तर्फे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची प्रतिमा साते ग्रामस्थांना भेट देण्यात आली. यावेळी पेशवे घराण्याचे वारसदार महेंद्र पेशवा, मराठी तोफखाना प्रमुख इब्राहिमखान गारदी यांचे वारसदार रेहान सरदार, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते. 
मोहन शेटे म्हणाले, अठराव्या शतकात मराठयांनी आपल्या पराक्रमाने परकीय शत्रूंपासून भारताचे रक्षण केले. पानिपतच्या युद्धात जरी आपला पराभव झाला, तरी त्यामध्ये मराठयांनी दाखविलेल्या शौर्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. नानासाहेबांमुळे पुणे शहराचा राजधानी म्हणून विकास झाला, असेही त्यांनी सांगितले. 

डिसेंबर २०२१ मध्ये नानासाहेब पेशवे यांचा ३०० वा जन्मदिन भव्य प्रमाणात साजरा करण्याचे कार्यक्रमात निश्चित करण्यात आले. स्वप्निल आवटे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: