अरुण पवार यांचा शांतीदूत सेवारत्न पुरस्काराने गौरव
पिंपरी – सामाजिक कार्य आणि पर्यावरणा संदर्भात केलेल्या कार्याची दखल घेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शांतीदूत परिवाराच्या वतीने मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांना ‘शांतीदूत सेवारत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
शांतीदूत परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वायरलेस ग्रामिणचे डीआयजी राजेंद्र डहाळे, सायबर क्राईम डीसीपी भाग्यश्री नवटके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शांतीदूत परिवाराचे सर्वेसर्वा विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, विद्याताई जाधव, साखर आयुक्त शेखर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.