Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENT

‘सलमान सोसायटी’ चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये दिसणार पाहूण्या भूमिकेत

दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार यांच्या ‘सलमान सोसायटी’ या पहिल्या मराठी सिनेमाचा मुहूर्त अभिनेता सोनू सूदच्या उपस्थितीत पार पडला होता .’पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया’ अशी टॅगलाइन असलेला हा सिनेमा बाल शिक्षणासारख्या विषयावर भाष्य करणारा आहे.

अभिनेता उपेंद्र लिमये ह्यांनी चित्रपट सलमान सोसायटी मध्ये एक पाहुण्या भूमिकेत दिसणार आहेत, काही दिवसांपूर्वी उपेंद्र लिमये ह्यांनी आपल्या भूमिकेच्या हिस्सेचे डब्बिंग पूर्ण केले ह्यावेळी चित्रपटाचे निर्माते श्री शांताराम भोंडवे अवार्जुन उपस्थित होते. ह्यावेळी अभिनेते उपेंद्र लिमये ह्यांनी निर्मात्यांना चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या, आणि लवकरच चित्रपट सिनेमाघरात लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली ।

सलमान सोसायटी ह्या चित्रपटात मध्ये आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारे गौरव मोरे , नम्रता आवटे महाराष्ट्रा ची हास्यजत्रा फेम आपल्याला एका वेगळ्या ,महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच ह्या चित्रपटात पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार  ही प्रसिद्ध बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. बाल कलाकार पुष्कर लोनकरने ह्या आदी एलिझाबेथ एकादशी, बाजी, रांजण, चि .व चि .सौ. का, फिरकी आणि टी. टी. एम. एम चित्रपटात अभिनय केलाय तर  शुभम मोरे ह्याने हिंदी चित्रपट रईस मध्ये बालपणच्या शाहरुख़ खान ची भूमिका वटवली तसेच हाफ टिकिट, फास्टर फेने सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने हाफ टिकिट ,माउली, ताजमहल आणि येरे येरे पावसा मध्ये भूमिका केल्या आहेत.
सलमान सोसायटीचे चित्रीकरण एकूण ३ शेडूल पूर्ण केले असून चित्रपटाचे चित्रीकरण आटपाडी,नाशिक,मुंबई , नवी मुंबई च्या जवळील भागातच झाले आहे तसेच चित्रपट ह्या वर्षी  लवकरात लवकर प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांचा आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading