fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENT

‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत

‘प्यार का पंचनामा’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटांसोबत ‘मिर्झापुर’, ‘बिच्छू का खेल’ या वेबसिरीजमध्ये  झळकलेला दिव्यांदू शर्मा आता ‘मेरे देश की धरती’ चित्रपटात जरा हटके भूमिकेत दिसणार आहे. दिव्यांदू शर्माने आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकलीआहेत. मॉर्डन लुक व हातात कुदळ असलेला या चित्रपटातील त्याचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. वैशाली सरवणकर यांची निर्मिती असलेला ‘मेरे देश की धरती’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

दोन इंजिनिअर्स तरुण स्वत:ची नोकरी करत असताना, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी जपण्यासाठी कसे शेतकरी बनतात, ह्याची हलकी फुलकी रंजक कथा ‘मेरे देश की धरती… देश बदल रहा है’ या चित्रपटातून उलगडणार आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना दिव्यांदू सांगतो कि, ‘मला खूप अभिमान वाटतो की, मी शेतकऱ्याच्या एका वेगळ्या भूमिकेत काम करू शकलो. आज आपल्या देशात असंख्य शेतकरी खडतर मेहनत करून सुद्धा पोटभर जेऊ शकत नाहीत. हे चित्र नव्या विचारांनी बदलले जाऊ शकते त्यासाठी तरुण नेतृत्वाने पुढे येऊन काहीतरी करण्याची गरज आहे, हा संदेश देणारा हा चित्रपट आणि तशा धाटणीची माझी भूमिका रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास दिव्यांदू शर्मा व्यक्त करतो. दिव्यांदू शर्मा सोबत या चित्रपटात अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारांच्यासुद्धा भूमिका आहेत.

‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाची संकल्पना डॉ. श्रीकांत बासी यांची आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाला साजेसं संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले असून छायांकन हरी वेदांतम यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन पवन आणि बॉब यांचे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading