विकास भांबुरे यांना कोवीड वाॅरीयर सन्मान

पुणे – कोरोना संसर्ग काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दाऊदी बोहरा समाजातर्फे कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांना “कोवीड वाॅरीयर” सन्मानाने गौरविण्यात आले.

पुणे कँन्टोन्मेंट बोर्ड येथे झालेल्या या कार्यक्रमात दाऊदी बोहरा समाजाचे अब्दल अली भाईसाहब यांच्या हस्ते भांबुरे यांना सन्मानचिन्ह व भेट वस्तू प्रदान करण्यात आली. यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार , लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम , नगरसेवक दिलीप गिरमकर, रूपाली बिडकर,विनोद मथुरावाला, प्रियंका श्रीगिरी, झोहेरभाई हारनेसवाला आदी उपस्थित होते.
कोरोना संसर्ग काळात विकास भांबुरे यांनी कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष व विशेष पोलीस अधिकारी यामाध्यमातून गरजूंना अन्नधान्य कीट वाटप ,बेघरांना अन्नदान, रूग्णांना वैद्यकीय मदत, सँनेटायझर वाटप, कोरोनाबाबत जनजागृती, लाॅकडाऊन काळात पोलीसांसोबत नाकाबंदी बंदोबस्त, स.व.पटेल रुग्णालयाचे वैद्यकीय पथक नागरि क्षेत्रात आणून नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात पुढाकार, कोरोना संसर्ग काळात योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कोरोना योध्दा सन्मानाने गौरव आदी उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले आहेत.
त्यांना मिळालेल्या कोवीड वाॅरीयर सन्मानामुळे कॅम्प भागातील विविध सामाजिक संस्था व मंडळांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: