अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये सुरक्षित वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा

पिंपरी, दि. 27- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये दरवर्षी प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. यंदा मात्र कोविड 19 मुळे थोडक्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून सुरक्षित वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भटू शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच ऑनलाईन पद्धतीनेही विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या शिक्षिका नीलम मेमाणे आणि क्रीडाशिक्षक रामेश्वर हराळे यांनी ऑनलाईन कार्यक्रमाचे संयोजन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, विचार व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, मधु दाणी, पर्यवेक्षिका आशा घोरपडे, प्रिया मेनन, नीलम पवार, स्वाती तोडकर आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होता. शाळेच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करीत पालकांनीही आपला ऑनलाइन सहभाग नोंदवला.

Leave a Reply

%d bloggers like this: