’90’sची लढाई: अल्का याज्ञिक विरुद्ध कुमार सानू

बॉलिवूडमधील सर्वात एव्हरग्रीन आणि लोकप्रिय गाणी तयार झाली, गायली आणि दिग्दर्शित केली ती ९० च्या दशकता. किंबहुना संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट काही गाणी याच काळात तयार झाली. ९० च्या काळातील हाच उत्साह चिरंतन राहण्यासाठी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनरील ‘इंडियन आयडॉल 12’ने 90’s चा हा विशेष भाग सादर केला आहे.

या विशेष भागात गायिका अल्का याज्ञिक, गायक कुमार सानू आणि उदित नारायण यांचा समावेश आहे. संगीत क्षेत्रातील आदर्श व्यक्तींसमोर, ज्यांची गाणी ऐकत स्पर्धक मोठे झाले, त्यांच्यासमोर सादरीकरण करण्यास स्पर्धक खूप उत्सुक आहेत. विशेषत:या भागामध्ये 90’s च्या दशकातील अल्का याज्ञिक व कुमार सानू यांच्यातील लढाई दर्शवण्यात आली असून स्पर्धकांनीही आपापली बाजू निवडली आहे! सर्व मुली कुमार सानूच्या बाजूने तर मुले अल्का याज्ञिक यांच्याकडून आहेत.

 90’s या विशेष भागाची थीम आणि वैशिष्ट्य म्हणजे, यात सुमारे १०० गाणी समाविष्ट असून यातच त्याचा उत्साह सामावला आहे. हा विकेंड निश्चितच सर्वांसाठी शोधाचा विषय ठरेल, कारण स्पर्धकांनी त्यांचा उत्साह वर्णन करताना म्हटले की, “ अल्काजी, कुमार सानू सर आणि उदित नारायणजी यांच्यासमोर परफॉर्म करण्यासाठी आम्ही फार काळ प्रतीक्षा करू शकत नाहीत. आम्ही अजून काय सांगणार? या एपिसोडसाठी आमची तयार आणि सराव जोरात सुरू आहे. आम्ही आमच्या सर्वोच्च पातळीवर प्रयत्न करू, अशी आशा आहे.”परीक्षक विशाल दादलानी, नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनीही स्पर्धकांच्या सुरात सूर मिसळत म्हटले की , “ या 90’s स्पेशल विकेंडसाठी आमची मुले सुपर चार्ज्ड झाली असून आमचीही तीच स्थिती आहे! अल्काजी, कुमार सानूजी आणि उदित नारायणजी हे आमचे कायमच प्रेरणास्थान राहिले आहे. आमच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहिल्याने निश्चितच शो ची शान वाढेल.”

Leave a Reply

%d bloggers like this: