fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENT

‘डॉक्टर डॉन’ मालिकेने गाठला २०० भागांचा टप्पा

देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालतला आहे. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या. या मालिकेने नुकतेच २०० भागांचा टप्पा गाठला आहे. सेटवर केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने हा यशस्वी माईलस्टोन गाठला असं मालिकेचा प्रमुख अभिनेता देवदत्त नागे याचे म्हणणे आहे.

या आनंदाच्या क्षणी देवा म्हणजे अभिनेता देवदत्त नागे म्हणाला, “डॉक्टर डॉन या मालिकेला जवळपास १ वर्ष पूर्ण झालंय आणि मालिकेने २०० भागांचा टप्पा देखील गाठला. हे सगळं रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमचे आणि प्रेक्षकांचे मी खूप खूप आभार मानतो. प्रेक्षक वेळात वेळ काढून आम्हाला रोज टीव्ही स्क्रीनवर बघतात आणि आमच्यावर खूप प्रेम करतात. आम्ही कलाकार टीव्हीवर दिसतो पण प्रत्येक भाग तुमच्यासमोर सादर करण्यासाठी पडद्यामागे खूप मोठी टीम कार्यरत आहे या संपूर्ण टीमचे देखील मी अभिनंदन करतो. प्रेक्षक या पुढेही आमच्यावर असाच प्रेम करत राहतील याची मला खात्री आहे.”  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading