कारगिल युद्धातील त्याग आणि धैर्याची कथा अनुभवायला मिळणार

आज २१ वर्षानंतर देखील कारगिल युद्धातील भारतीय  शूरवीरांचे बलिदान संपूर्ण देशातील लोकांच्या मनात कायम आहे. भारतीय प्रदेशात पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरी नंतर मे १९९९ मध्ये हे युद्ध सुरू झाले होते.हे युद्ध ६० दिवस चालले होते आणि नंतर भारतीय सैन्याने भारतीय प्रदेश पुन्हा ताब्यात घेऊनच या युद्धाचा अंत केला होता. या युद्धाच्या २ महिन्यांमध्ये भारतीय सैन्याने हे सिद्ध केले कि पूर्णपणे विजय प्राप्त केल्यावरच ते थांबेल. आणि आता लष्करी कर्मचारी तसेच ऐतिहासिक नोंदणीच्या विशेष प्रवेशासह, विजय प्राप्त करण्यासाठी भारतीय सैनिकांच्या संघर्षाची नाटकीय पुनरावृत्ती करून हिस्ट्रीटीव्ही 18 पुन्हा एकदा ‘ऑपरेशन विजय’ची कथा सांगणार आहे.

२६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता ‘कारगिल:वॅलोर अँड व्हिक्टरी ’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही भारतीय सैनिकांच्या संघर्षाची कहाणी पुन्हा एकदा अनुभवू शकाल. न खचणाऱ्या शौर्याची वास्तविक कथा सांगत या मिल्ट्री डॉक्युमेंट्री मध्ये कारगिल युद्धाच्या घटनांची रूपरेखा तसेच सगळ्यात समोर असलेल्या पाच असामान्य तरुणांच्या शौर्याची आणि संघर्षाची वास्तविक कथा सांगितली जाणार आहे, ज्यांचा संघर्ष भारतीय पिढ्यांसाठी बलिदान आणि धैर्याची परिभाषा परिभाषित करते. हे सैनिक भारतासाठी लढणाऱ्या अनेक वीरांचे प्रतिनिधित्व करतात.सुमारे ३०,००० भारतीय सैनिकांनी या युद्धात त्यांची भूमिका बजावली होती त्यापैकी ५०० सैनिक शहिद झाले होते तर १,३०० पेक्षा अधिक जखमी झाले होते.आणि हि डॉक्युमेंट्री या सर्व सैनिकांना श्रद्धांजली आहे.या चित्रपटात प्रमुख लष्करी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे जे त्यावेळी या युद्धात देखील सामील होते. प्रेक्षक, माजी लष्करप्रमुख,जनरल वेद प्रकाश मलिक पीवीएसएम,एवीएसएम (सेवानिवृत्त), माजी जीओसी ८ माऊंटेन विभाग, लेफ्टनंट जनरल मोहिंदर पुरी पीवीएसएम,यूवायएसएम (सेवानिवृत्त), माजी ब्रिगेड कमांडर ८ माऊंटेन तोफखाना ब्रिगेड,मेजर जनरल लखविंदर सिंग,वायएसएम (सेवानिवृत्त) आणि धोरणात्मक संरक्षण विश्लेषक नितीन ए. गोखले यांच्या द्वारे कारगिल युद्धातील घटना ऐकू शकतील.

कारगिल युद्ध हे न्यूक्लियर युगातील, भारतीय उपखंडातील पहिले सशस्त्र युद्ध होते.घुसखोर शेजारी देशाच्या आक्षेपार्ह कृतीस प्रतिसाद देत, भारतीय सैन्याने सर्वात दुर्गम हिमालयी प्रदेशात सुमारे १५,००० फूट उंचीवर लष्करी कारवाई केली होती. युवा भारतीय अधिकारी आणि जवान शत्रूला हुसकावून लावण्यासाठी आणि भारतीय प्रदेश परत मिळविण्यासाठी, लद्दाखच्या ओसाड उतार आणि शिखरांवरील कठीण परिस्थिती ऑक्सिजनची कमतरता, कठीण चढ,यांसारख्या अनेक आव्हांनाना सामोरे  गेले होते. युद्ध जिंकेपर्यंत भारताने त्याचे अनेक उत्कृष्ट सैनिक गमावले होते.परमवीर चक्र हा सर्वोच्च सैन्य सन्मान कॅप्टन मनोजकुमार पांडे, ग्रेनेडीयर योगेंद्रसिंग यादव आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांना प्रदान करण्यात आला.कॅप्टन अनुज नय्यर यांना महावीर चक्र, तर कॅप्टन हनीफ उददिन यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आले.या डॉक्युमेंट्री मध्ये या युद्धाच्या काळातील शूरवीरांची कहाणी सांगण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: