Saturday, May 30, 2026
PUNE

प्रदेश काँग्रेस कोअर कमिटीच्या सदस्यपदी चैतन्य पुरंदरे यांची निवड 

पुणे, दि. १९ – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या कोअर कमिटी सदस्य व मराठवाडा विभागाच्या प्रभारीपदी चैतन्य पुरंदरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसचे सोशल मीडिया विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने हि नियुक्ती करण्यात आल्याचे सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अभिजित सपकाळ यांनी सांगितले. पुरंदरे यांनी यापूर्वी पुणे शहर काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षपदी तसेच शहर संघटक म्हणून काम केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुणे शहर काँग्रेसची सोशल मीडिया वॉर रूम सांभाळण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. तसेच सोशल मीडियाच्या संघटनात्मक बांधणीवर देखील त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भर दिला होता. त्यांच्या नविन नियुक्तीबद्दल शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading