होंडातर्फे ग्राझियाची स्पोर्ट्स एडिशन लाँच
नवी दिल्ली – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज आधुनिक, शहरी, 125 सीसी स्कूटर नव्या अवतारात लाँच केली, ती म्हणजे – स्पोर्टी, स्टनिंग, जीनियस – ग्राझिया स्पोर्ट्स एडिशन.
नव्या ग्राझिया स्पोर्ट्स आवृत्तीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘होंडाने गेल्या 20 वर्षांत बाजारपेठेची समीकरणे बदलली असून ही बाजारपेठ काळानुसार मोठ्या प्रमाणावर विस्तारली आहे. प्रीमियम स्कूटर क्षेत्रात आणखी थरार निर्माण करण्यासाठी ग्राझियाची नवी स्पोर्ट्स एडिशन – या विभागातील सर्वात आधुनिक स्कूटर लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे.’
या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘होंडा ग्राझिया ही आधुनिक 125 सीसी शहरी स्कूटर असून ज्या चालकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे आकर्षक व मजेदार स्कूटर चालवायला आवडते, त्यांच्यासाठी ही खास बनवण्यात आली आहे. ग्राझिया स्पोर्ट्स आवृत्ती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे. शैक्षणिक संस्था परत खुल्या होत असताना दुचाकी हवी असणाऱ्यांची ग्राझिया स्पोर्ट्स एडिशनला पहिली पसंती मिळेल हे नक्की.’
