Sunday, May 31, 2026
MAHARASHTRAPUNE

समाजाप्रती कृतज्ञता भावनेतून काम केल्यास चांगले कार्य घडते- महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे, दि. 14 – कोरोनाच्या काळात जिल्हा, राज्य आणि केंद्रस्तरावर सगळ््यांनी एकत्रित काम केले, त्यामुळे खूप लवकर या संकटातून बाहेर पडू शकलो. सगळ्या व्यवस्था रात्रंदिवस या काळात काम करीत होत्या. परंतु सामाजिक संस्थामुळे या काळात निर्माण झालेला ताण कमी झाला. समाजाप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून जेव्हा आपण काम करतो, तेव्हा आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत, तिथे चांगले कार्य घडते, असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. 


सोशल रिस्पॉन्सिबीलीटी आणि महा एनजीओ फेडरेशनतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार, विवेकानंद पुरस्कार आणि जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस अधिकारी प्रेमा पाटील, रमेश अगरवाल, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, सोशल रिस्पॉसिबीलिटीचे अध्यक्ष विजय वरूडकर, पुरस्कार समिती प्रमुख सुनील जोशी आदी उपस्थित होते. 
जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेडॉ.अभिजीत सोनवणे, दिनकर कांबळे, नवनाथ जगताप यांचा विशेष सन्मान कार्यक्रमात करण्यात आला. विवेकानंद पुरस्काराने मयूर बागुल, उमाकांत मीटकर, दामोदर रामदासी, विनायक रायकर, प्रल्हाद कुटे, आनंदा थोरात, अविनाश गोफणे या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. तर, जिजाऊ पुरस्काराने चंद्रकला भार्गव, अनिता झांबरे, मीना भोसले, नलिनी शेरकुरे, पुष्पलता डोके, हर्षाली चौधरी, यती राऊत यांना सन्मानित करण्यात आले.
कृष्ण प्रकाश म्हणले, छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी घडविले. शिवाजी महाराजांना जिजाऊंनी अवघड परिस्थितीत त्यांना घडविले, त्यामुळे शिवाजी महाराज जाणते राजे झाले आणि त्यांंनी स्वराज्याची स्थापना केली. दुर्बलतेचा परित्याग करा, आपल्या देशाला मजबूत मन आणि मजबूत देहाची गरज आहे. या दोन गोष्टी लहानपणापासून डोक्यात होत्या आणि हे स्वामी विवेकानंदांनी शिकविले, पोलिस अधिकारी म्हणून काम करताना या शिकवणींचा उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले. 
प्रेमा पाटील म्हणाल्या, समाजातील सगळ््यांना सामाजिक कार्य करण्याची समान संधी मिळते. परंतु खूप कमी जणांना ती संधी समजते आणि ते त्या संधीचे सोने करतात. त्यामुळे काम करण्याची संधी मिळाली नाही असे म्हणू नका, आपापल्या परिने समाजासाठी काम करीत रहा, असे त्यांनी सांगितले. 
शेखर मुंदडा म्हणाले, महा एनजीओ फेडरेशनसोबत आज २ हजार सामाजिक संस्था आहेत. त्यातील अनेक संस्था महिला चालवितात. समाजात अनेक संस्था चांगले काम करीत असतात, त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. त्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न महाएनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून करीत आहोत.  
विजय वरुडकर म्हणाले, सामाजिक कार्यकर्त्याला सक्षमता मिळाली पाहिजे. हे कार्यकर्ते एकत्र आले तर वज्रमूठ तयार होईल आणि समाजात मोठ्या प्रमाणात सकारात्मक कार्य घडेल. यासाठी महाराष्ट्र भरातील सामाजिक संस्थाना संघटित करण्याचे काम आम्ही करीत आहोत.

मुकुंद शिंदे, अमोल उंबरजे, वैभव मोगरेकर, भाग्यश्री साठे, अक्षय महाराज भोसले, सचिन इटकर, अनिल पाटील, सचिन निवंगुणे, सचिन पवार , वीरेंद्र बोराडे, अ‍ॅड. कान्होपात्रा गायकवाड, जगदीश गजऋषि, बाबू शीवांगी, डॉ रवींद्र वाघोले, विशाल वरूडकर, नारायण फड, राहुल पाटील आदींनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला. देवा झिंजाड यांनी सूत्रसंचालन केले. गणेश बाकले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading