आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते एल. डी. भोसले यांचे निधन

पुणे, दि. 13 – आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते तसेच भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक नेते एल. डी. भोसले यांचे बुधवारी सकाळी निधन झाले.

तब्बल 50 पेक्षा अधिक वर्षांपासून आंबेडकरी विचारांची कास धरत महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळी मध्ये भोसले यांनी मोठे योगदान दिले आहे. नंतर दलित पँथर या आक्रमक संघटनेचे संस्थापक सदस्य व प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या भोसले यांनी पुढील काळात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या समवेत राजकारण करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार त्यांनी सम्यक समाज आंदोलन व भारिप बहुजन महासंघ तसेच आज आखिर वंचित बहुजन आघाडी समवेत कार्यक्रम आणि पसंत केले.

पुणे महानगरपालिका मंडळावर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले असून त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झालेली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: