fbpx
Thursday, April 25, 2024
Business

आयडीबीआय बँकेतर्फे आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमधील हिश्श्याची एजिएस आणि फेडरल बँकेला विक्री

मुंबई – 6 ऑगस्ट 2020 रोजी आयडीबीआय बँकेने आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या संयुक्त भागिदारी विमा कंपनीतील 27 टक्के हिश्श्याची दुसरे संयुक्त भागीदार एजिएस इन्शुरन्स इंटरनॅशनल एनव्ही आणि द फेडरल बँक लिमिटेड यांना विक्री करण्याच्या कराराची अंमलबजावणी करत असल्याचे जाहीर केले होते. विक्री करत असलेल्या एकूण हिश्श्यापैकी 23 टक्के भाग एजिएसला, तर उर्वरित 4 टक्के हिस्सा फेडरल बँकेला विकण्यात आला होता.

सद्यस्थितीत आयडीबीआय बँकेने एजिएसला 23 टक्के हिश्श्याची विक्री पूर्ण केली असून संबंधित नियामक मान्यता मिळाली आहे. यामुळे आयडीबीआय बँकेकडे असलेला आयएफएलआयमधील एकूण हिस्सा आधीच्या 48 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आला आहे. या व्यवहारानंतर संयुक्त भागिदारीचे एजिएस फेडरल लाइफ इन्शुरन्स कंपनी असे नामकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading