Saturday, June 13, 2026
PUNE

कर्तव्य फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

पुणे – कर्तव्य फाउंडेशनच्या सन २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प.महाराष्ट्र रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन दुधाणे व लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे,कार्याध्यक्ष अशोक देशमुख व सदस्य मोहसीन शेख आदी उपस्थित होते.लष्कर पोलीस ठाण्यात पार पडलेल्या प्रकाशन प्रसंगी मोहन दुधाणे व अशोक कदम यांनी कर्तव्य फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून नूतन दिनदर्शिकेस शुभेच्छा दिल्या.
या दिनदर्शिकेमध्ये तारीख,वार, तिथी, सण, मुहूर्त, यात्रा, जयंती, मान्यवरांचे वाढदिवस, दिनविशेष आदींची माहीती देण्यात आली असून संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षपूर्तीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे.कॅम्प भागात याचे वाटप करण्यात येणार आहे असे फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading