Saturday, June 13, 2026
BusinessLIFESTYLE

पर्यटकांची शिर्डी आणि गोव्याला सर्वाधिक पसंती

ओयोतर्फे  एस्केपरूट्स या भारतातील टाॅप १५० पर्यटनस्थळांची यादी जाहीर

पुणे, दि. २३ – जगभरामध्ये पर्यटनाला पुन्हा चालना मिळत आहे. विविध देशांमध्ये टप्प्या-टप्प्यांमध्ये केलेल्या अनलाॅक प्रक्रियेमुळे सुटीचा आनंद घेण्यासाठी प्रवास करण्याची इच्छा अनेकांना होते आहे. ओयोतर्फे   नुकत्याच करण्यात आलेल्या ग्राहकांच्या सर्वेक्षणात सुमारे ५७ टक्के ग्राहकांनी त्यांचा पुढील प्रवास हा सुटीचा आनंद लुटण्यासाठी असेल असे म्हटले आहे. या सर्वेक्षणात ४३ टक्के ग्राहकांनी व्यवसायानिमित्त प्रवास करणार  असल्याचेही म्हटले आहे. 

अनलाॅक प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशांतर्गत पर्यटनामध्ये वाढ झाली आहे. देशातील एकूण ठिकाणांपैकी ५५ टक्के ठिकाणी ही ओयोच्या टाॅप १२ स्थळांमध्ये समाविष्ट झालेली आहेत. ही ठिकाणे मुख्यत्वे देशातील धार्मिक वा अध्यात्मिक केंद्र, शहरे, वारसा व ऐतिहासिक स्थळे तसेच समुद्रकिनारे आहेत. ३० डिसेंबर २०२० आणि १ जानेवारी २०२१ या दोन दिवसांमध्ये सर्वाधिक मागणी गोवा आणि हिमाचल प्रदेश येथील हाॅटेल्सला आहे. २०२१ मध्ये जयपूर, गोवा आणि कोची ही ठिकाणे सर्वाधिक लोकप्रिय ठरतील असा ओयोचा अंदाज आहे. ग्राहकांच्या प्रचंड मागणीमुळे आणि त्यांनी दिलेल्या रेटिंग्ज व अभिप्रायामुळे ओयो हाॅटेल्स अँड होम्सतर्फे एस्केपरूट्स या १५० हून अधिक सर्वाधिक लोकप्रिय अशा पर्यटनस्थळांची यादी जाहीर करण्यात आली आहे.समुद्रकिनाऱ्यांवर असलेल्या पर्यटनस्थळांना देशभरातून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहिल्यानंतर ओयोने या आठवड्यात चल बिच चले ही मोहीम राबविण्यास सुरू केली आहे. याच वर्षी जेव्हा हिल स्टेशनच्या सीमा पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या तेव्हा ओयोने  चल पहाड  मोहीम राबविली होती व त्या उपक्रमाला ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला होता.   

भारतातील देशांतर्गत पर्यटनाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना ओयो हाॅटेल्स अँड होम्सचे दक्षिण आशियाचे आॅनलाईन उत्पन्न आणि विपणन प्रमुख यतिश जैन म्हणाले  ग्राहकांना परवडेल अशा आणि दर्जेदार निवासी व्यवस्था असलेल्या सुविधा देण्याबरोबरच आमच्याबरोबर भागीदार असलेल्या अॅसेट

पार्टनर्सना मदत करण्यासाठी आम्ही ओयोच्या वास्तूंमध्ये आयएसओ-प्रमाणित क्वाॅलिटी मॅनेजमेंट स्टँडर्ड्सचे पालन करीत आहोत.  

तसेच नावीन्यपूर्ण आरोग्यकारक अशा उपाययोजना म्हणजे तुमच्या डोळ्यांदेखत केलेले सॅनिटायझेशन आणि संपर्कविरहित प्रवेश (चेक-इन) होत आहे

आमचे प्रयत्न आणि ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे यंदाच्या सुटीच्या काळात पर्यटनामध्ये २०२१ मध्ये दर महिन्याला वाढ होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading