विरोधक शेतकऱ्यांना घाबरवत आहेत, शेतकरी संमेलनात नरेंद्र मोदींचा आरोप
नवी दिल्ली – ज्यांची राजकीय जमीन गेली, ते आज शेतकऱ्यांना घाबरवत आहेत की त्यांची जमीन जाईल, जे आज अश्रू गाळत आहेत, त्यांनीच आठ वर्षांपर्यंत स्वामीनाथन रिपोर्टला दाबून ठेवलं होतं, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यांनी आंध्र प्रदेश येथील शेतकरी संमेलनात शेतकऱ्यांना संबोधित केले.
व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांबद्दल चर्चा शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी एमएसपी, कोल्ड स्टोरेज, एपीएमसी मंडळं आणि कंत्राटी शेतीबाबत शेतकऱ्यांचा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोदी म्हणाले की, कंत्राटी शेतीचा जमिनीशी काही संबंध नाही. नैसर्गिक आपत्ती झाली तरी शेतकर्याला पूर्ण पैसे मिळतात.
गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांनी कृषीकायद्याविरोधात आंदोलन छेडलं आहे. हे आंदोलन मागे घ्यावे, किंवा सरकारने कृषी कायदे स्थगिती करावेत असा सल्ला सर्वोच्च न्यायालयानेही दिला. मात्र, सरकारने सर्वोच्च न्यालायालाही नकार कळवला आहे. त्यामुळे सरकार आणि शेतकरी संघनटा यांच्यातील द्वंद्व वाढीस लागले आहे. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी संमेलनालासंबोधित करताना विरोधकांवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधकांनी शेतकऱ्यांवर खर्च केला नाही, जे काम 25 वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं ते आज करावं लागत आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या त्या मागण्या पूर्ण केल्या आहेत ज्या गेल्या अनेक वर्षांपासून रोखण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांसाठी जो कायदा तयार करण्यात आला आहे तो रात्रभरात तयार झालेला नाही, गेल्या दशकापासून केंद्र, राज्य सरकार आणि उइतर संस्था यावर चर्चा करत आहेत.
ते पुढे म्हणाले की, अद्यापही काही शंका असेल तर आम्ही मान झुकवून-हात जोडून प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत. देशातील शेतकरी आणि शेतकऱ्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे. पुन्हा एकदा 25 डिसेंबर रोजी मी देशातील शेतकऱ्यांशी चर्चा करेन. काँग्रेसने गेल्या दहा वर्षात फक्त एकदा 50 हजार कोटीच्या कर्ज माफीची घोषणा केली, पण आमच्या सरकारने किसान सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी 75 हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं.
काँग्रेस जेवढं आश्वासन देते तितकं कर्ज माफ करत नाही. याचा फायदा काँग्रेसच्या जवळच्या आणि नातेवाईकांना मिळतो. हे फक्त मोठ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत होते आणि त्यांना असं वाटायचं की त्यांचं काम संपलं. मला क्रेडिट देऊ नका. तुमच्या जुन्या घोषणापत्रांना द्या. मला शेतकऱ्यांचा फायदा हवा आहे. तुम्ही (काँग्रेस) शेतकऱ्यांना भ्रमित करु नका. हा कायदा लागू होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्तचा कालावधी झाला आहे, पण अचानक विरोधक असे मुद्दे उचलत आहेत. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली जात आहे, असंही मोदी म्हणाले.
तसंच, आम्ही शेतकऱ्यांना दीडपट जास्त MSP दिला. काँग्रेसने केलेली कर्जमाफी हा सर्वात मोठा धोका आहे. मध्य प्रदेशातील निवडणुकीवेळी 10 दिवसात कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं पण केलं नाही, राजस्थानातही तेच झालं, असंहीी ते म्हणाले.
