भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मोटिव्हेशनल इनोव्हेशन टॉक्स’ला चांगला प्रतिसाद
पुणे : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील इनोव्हेशन कौन्सिल तर्फे ‘मोटिव्हेशनल सेशन बाय इनोव्हेटर्स ‘या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शनीवार १२ डिसेंबर रोजी दुपारी १ ते २ या वेळेत हा संवाद कार्यक्रम पार पडला.भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव अध्यक्ष स्थानी होते. विद्यार्थ्यांमध्ये कल्पक आणि शाश्वत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
ओटोपार्क टेक्नॉलॉजिकल सर्व्हिसेस प्रा लि चे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्ता यांनी मार्गदर्शन केले.२०० विद्यार्थी,संशोधक,प्राध्यापक सहभागी झाले.
‘नव संकल्पना मांडणारे संकल्पकच नव निर्मिती करणारे निर्माते ठरतात’असे प्रतिपादन आकाश गुप्ता यांनी केले.ते म्हणाले,’प्रामाणिकपणा,कष्ट,दूरदृष्टी आणि वास्तवाची जाण या गोष्टी आपल्याला यशाकडे घेवून जातात.आपल्याकडे चांगले बिझनेस मॉडेल असेल तर भांडवल नक्की उपलब्ध होते.
‘शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ८० टक्के विद्यार्थी हे रोजगार मागणारे न होता ,रोजगार देणारे होतील,याची काळजी महाविद्यालयांनी घेतली पाहिजे,असे प्रतिपादन डॉ आनंद भालेराव यांनी केले. प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर कार्यक्रम संपला.
