Sunday, April 5, 2026
PUNE

चित्रकार महालक्ष्मी पवार यांना मेरीट अ‍ॅवॉर्ड

पुणे : कर्नाटक बिदर येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या वतीने आॅल इंडिया आॅनलाईन पेंटींगचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चित्रकार महालक्ष्मी पवार यांना मेरीट अ‍ॅवॉर्ड मिळाले. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून चित्रकार सहभागी झाले होते. 


  चित्रकार महालक्ष्मी पवार यांना यापूर्वी राजस्थान येथील राष्ट्रीय कला मंचच्या वतीने कलाश्री पुरस्कार देखील मिळाला आहे. रिसिल या रिसर्च करणा-या संस्थेतर्फे आयोजित महा बिझनेस अ‍ॅवॉर्ड २०१९ अंतर्गत मोस्ट अ‍ॅडमायरेबल आर्टिस्ट या पुरस्काराने नाशिक  येथे त्यांना सन्मानित करण्यात आले होते. यंग चिल्डेÑन अ‍ँड आर्ट अ‍ॅकॅडमीतर्फे एमेनंट आर्टीस्ट पुरस्कार देखील मिळाला आहे. 


पवार यांना या आधी देखील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. उत्तराखंड येथील आर्ट, आर्टिस्ट, आर्टिस्टिक ग्लोबल ग्रुपतर्फे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय आॅनलाईन चित्रकला स्पर्धेत देखील त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. भारताच्या विविध भागातून सुवर्ण पदकासाठी निवडण्यात आलेल्या चित्रकारांपैकी पुण्यातील त्या एकमेव चित्रकार आहेत ज्यांनी हे सुवर्णपदक मिळविले आहे. 
महालक्ष्मी पवार या पुण्यातील आर्ट मॅजिक या ड्रॉईंग क्लासच्या संस्थापिका आहेत. संस्थेला आणि त्यांना त्यांच्या चित्रकलेतील योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट कला शिक्षिका, सर्वोत्कृष्ट चित्रकार याचप्रमाणे महिला दिनानिमित्त त्यांना तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच आझम कॅम्पस, पुणे यांच्यातर्फे त्यांना गोल्डन पिक्सेल अ‍ॅवॉर्डने देखीन सन्मानित करण्यात आले आहे. विविध वयोगटातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांची चित्रे रसिकांपर्यंत पोहोचावित, याकरीता त्या विविध प्रदर्शनांचे आयोजन देखील करतात.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading