‘अन्नदात्या बळीराजाचा’ अपमान व अवहेलना करण्याचा भाजप चा प्रयत्न निंदनीय – गोपाळदादा तिवारी
‘काही घटकांच्या व निवृत्त अधिकाऱ्यांच्या’ द्वारे ‘किसान आंदोलनास’ विदेशी कटाचा भाग ठरवण्याचा प्रयत्न
पुणे दि ११ – दिल्ली सीमेवर चाललेल्या शेतकरी आंदोलना’मागे चीन-पाकिस्तान चा हात आहे काय (?)” या विषयी’ नुकतीच एका चॅनेल वर चर्चा झाली. त्या मध्ये मी ही सहभागी होतो. चर्चे-दरम्यान’ काही बाबी स्पष्ट जाणवल्या.. पैकी, माजी पोलीस संचालक प्रशांत दिक्षीत यांनी तर ‘किसान आंदोलना’ मध्ये अर्बन नक्सलींची शक्यताच् वर्तवून, धक्कादायक व बिनबुडाचे आरोप केले, तेव्हा हे निष्कर्ष कशाच्या आधारे (?) असे विचारून या बाबत आवश्यक प्रतिबंधक प्रक्रिया’ आपण स्वत: काय केलीत(?) हे प्रश्न देखील कॅाग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी चर्चे दरम्यान केले व माजी अधिकारी यांनी जबाबदारीची जाणीव ठेवुन बोलण्याची अपेक्षा केली..
‘चॅनेल वरील’ चर्चेत दिक्षीत यांनी ‘शेतकरी आंदोलनात’ बाहेरील शक्तींचा हात असल्याची आघारहीन वक्तव्ये करून “शेतकऱ्यांच्या प्रामाणिक लढ्याची” अवहेलना करत असल्या बद्दल निषेध केला..
तसेच सध्या टीव्ही वरील चर्चे दरम्यान ‘किसान आंदोलनांचे’ चे नॅरेटीव्ह, निष्कर्ष – ऊद्देशच् कलूशीत करण्याच्या ‘सत्ता-पक्षाच्या कट-कारस्थानात’ “लोकशाहीचा ४था स्तंभ” असलेले “काही निवृत्त ‘IAS & IPS’ अधिकारी” देखील बळी पडत असुन, सत्तापक्षाचे ‘बटीक’ होत आहेत, ही ‘लोकशाहीची शोकांतिका’ असल्याचे म्हंटले आहे.. आपल्या ‘प्रशासकीय – सेवा काळातील’ प्राप्त विश्वासार्हतेचा बाजार मांडणार्या व स्वार्थ साधणार्या अघिकार्यांची सध्या ‘सत्ता पक्षा’ कडून चलती होत असल्याचा’ आरोप देखील कॅाग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला..!!
