Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

उद्याच्या भारत बंदला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

मुंबई, दि. 7 – केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद ला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा आहे. उद्या या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी सामील होणार आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतमाल खरेदी करावा. शेतमालाला योग्य भाव द्यावा, शेतमालाचे भाव कोसळले तर सरकारने तात्काळ 50 टक्के जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना द्यावी. उद्योगपतींच्या हिताचे कायदे रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading