Friday, September 4, 2026
ENTERTAINMENTTOP NEWS

दिलीप कुमार यांची प्रकृती नाजूक, त्यांच्यासाठी प्रार्थना करा – सायरा बानो

अभिनेते दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानो या दोघांची जोडी पाहून खरं प्रेम काय असतं, याची जाणीव होते. लग्नाला बरेच वर्ष होऊनही सायरा बानो दिलीप कुमार यांची स्वतःपेक्षा अधिक काळजी घेत असतात. प्रत्येक संकटात त्या दिलीप कुमार यांच्यासोबत असतात. दरम्यान आता दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आली आहे. पत्नी सायरा बानो यांनी स्वतः दिलीप कुमार यांच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. त्यांनी सांगितले की, दिलीप कुमार खूप कमजोर झाले आहेत आणि त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. काही वेळा ते हॉलपर्यंत येतात आणि पुन्हा ते खोलीत जातात. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करा.’

सायरा बानो पुढे अशा म्हणाल्या की, ‘कोणत्याही दबावापोटी मी दिलीप कुमार यांची काळजी घेत नाही आहेत, तर माझे दिलीप कुमार यांच्यावर खूप प्रेम आहे. दिलीप कुमार यांची काळजी घेण्यामागे असा कोणताही उद्देश नाही आहे की, लोक माझे कौतुक करतील. त्यांना स्पर्श करणे आणि त्यांच्यासोबत राहणे हे माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. मी त्यांच्यावर खूप प्रेम करते आणि ते माझा श्वास आहेत.’

माहितीनुसार, दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचा ११ ऑक्टोबरला लग्नाचा वाढदिवस होता. पण यावर्षी दिलीप कुमार यांच्या दोन भावाचे निधन झाल्यामुळे ते लग्नाचा वाढदिवस साजरा करू शकले नाहीत. या खास दिवशी सायरा बानो यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘११ ऑक्टोबर नेहमीच माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. या दिवशी दिलीप कुमार साहेबांनी माझ्यासोबत लग्न करून माझं स्वप्न पूर्ण केले होते.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading