अर्णब गोस्वामींना सुप्रीम कोर्टाचा झटका, प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्यास नकार
नवी दिल्ली – वास्तु सजावटकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
महाराष्ट्र पोलिसांकडून रिपब्लिक वाहिनीनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, तेथील कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. याविरोधात रिपब्लिकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर हे प्रकरणी सुनावणीसाठी आले होते. न्यायालयाने रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीलाही न्यायालयाने नकार दिला. याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना स्थानिक न्यायालयात जाण्यास मूभा दिली आहे.
“आपली इच्छा आहे की, महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करू नये. त्याचबरोबर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात यावं. यात हेच चांगले होईल की, आपण ही याचिका मागे घ्यावी,” असं न्यायालयानं सुनावलं. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली.
