Sunday, May 31, 2026
PUNE

केअर टेकर्स सोसायटीतर्फे डॉक्टर्सना ऑक्सीजन मशिन भेट

नगरसेविका रेखा टिंगरे व चंद्रकांत टिंगरे यांच्या हस्ते वितरण 

पुणे : अनेक रुग्णांना केवळ आॅक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांची स्थिती गंभीर होत रुग्ण दगावल्याचे चित्र शहरात दिसत आहे. ही परिस्थिती पाहता पुण्यातील केअर टेकर्स सोसायटीने पुढाकार घेत डॉ. मंगेश राजगुरू आणि डॉ.अजित केळकर यांना जर्मन मेड आॅक्सिजन मशिन दिले. नगरसेविका रेखा टिंगरे व चंद्रकांत टिंगरे यांच्या हस्ते आॅक्सिजन मशिन देण्यात आले.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संजय घावटे, केअर टेकर्स सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाला रणजित परदेशी, विजय बेलीटकर, इरफान मुल्ला, विष्णू दोशी यांचे सहकार्य लाभले. आशा बागुल, विधीतज्ञ सुफियान शेख यांच्या हस्ते सर्वांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. 
कुमार शिंदे म्हणाले, आॅक्सिजन बेड मिळेपर्यंत रुग्णांना या मशिनचा उपयोग होणार आहे. हे मिशन वापरण्यासाठी रुग्णांना डॉक्टरांचे मागणी पत्र व आधार कार्ड हे कागदपत्र लागणार असून हे मशिन मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुण्यातील सामाजिक संस्थांनी असे मशिन रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले तर अनेकांचे जीव वाचतील, असे ही त्यांनी सांगितले. संजय असरकर यांनी सूत्रसंचालन केले तर अमोल बागुल यांनी आभार  मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading