तेलाधारित अर्थव्यवस्थेकडून गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
पुणे : तेलाधारित अर्थव्यवस्थेकडून भारताची वाटचाल गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सिटी गॅस वितरण कंपन्या नैसर्गिक वायूच्या वापराची मागणी पूर्ण करण्यासाठी एकप्रकारे गेमचेंजर ठरत आहेत. त्यामुळे नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम मंत्रालयाने सीजीडी सेक्टरमध्ये नैसर्गिक वायू हे नव्या पिढीतील इंधन असल्याने यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घातले आहे, असे मत केंद्रीय स्टिल, नैसर्गिक वायू व पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)च्या ५ नव्या सीएनजी स्टेशन्सचे लोकार्पण आणि उद्घाटन एका आॅनलाइन कार्यक्रमाद्वारे झाले. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले,एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झालेल्या पुणे आणि नाशिक येथील ५ नव्या स्टेशनच्या उद्घाटनामुळे एमएनजीएलच्या सीएनजी स्टेशन्सची संख्या आता १०० वर पोहचली आहे.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले, देशात २०१४ पर्यंत केवळ एक हजार सीएनजी स्टेशन्स होती, त्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली असून सध्या देशात २५०० सीएनजी स्टेशन्स आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. देशातील सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन कंपनी आणि विशेषत: आॅईल मार्केटिंग कंपन्यांना (ओएमसी) आवाहन केले की, त्यांनी देशभरात सीएनजी स्टेशन्स सुरू करण्यासाठी पावले उचलावीत आणि येणाºया पाच ते सात वर्षात दहा हजार स्टेशन सुरू करण्याचा प्रयत्न करावा.
पर्यायी उर्जा कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर एलएनजी स्टेशन, इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स आणि सीएनजीचा वापर वाढविण्यासाठी विस्तार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. त्यामुळे उपकरणेनिर्मिती, रोजगाराच्या संधी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणसंर्धनाच्या दृष्टीने मदत मिळेल. पाईपलाइन नसलेल्या ठिकाणी सीएनजीचा पुरवठा करणाºया सर्वसोयींनीयुक्त मोबाईल रिफ्युलिंग युनिटचे काम प्रलंबित होते. ते एमएनजीएनले पूर्ण केले आहे.त्याबद्दल एमएनजीएलच्या या पुढाकाराचे आणि या क्षेत्रात एक इतिहास रचल्याबद्दल अभिनंदन केले.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले, गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे झालेल्या या बदलामुळे देशातील नागरिकांना परवडणाºया दरात आणि मुबलक प्रमाणात नैसर्गिक वायू मिळण्यासाठी आश्वस्त केले आहे. तसेच त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. त्याचा परिणाम आपला देश हरित आणि स्वच्छ व राहण्यासाठी योग्य असे ठिकाण बनणार आहे. पायाभूत सुविधांना प्रोत्साहन, टर्मिनल, स्टेशन्स आणि पाईपलाइन यांच्या उभारणी व विकासातून हे शक्य होणार आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेचा एक भाग असलेले एमएनजीएल हे स्वच्छ आणि हरित पर्यावरणासाठी भारताच्या अभियानाचे इंधन ठरणार आहे.
याचवेळी एमएनजीएलच्या पाथर्डी, नाशिक येथील एलएनजी/एलसीएनजी स्टेशन्ससाठी नागरी पायाभूत सुविधांची कामे आणि नाशिकमध्ये पाईपलाइनद्वारे गॅसपुरवठा करता न येउ शकणा?्या ठिकाणी बसमूधन सीएनजी पुरवठा करणा?्या अनोख्या मोबाईल रिफ्युलिंग युनिटचे (एमआरयू) उद्घाटनही यावेळी झाले. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते व्हर्च्युअल सोहळ्यामध्ये या सर्व सेवांचे उद्?घाटन झाले.एमएनजीएल ही सीटी गॅस डिस्ट्रिब्युशन (सीजीडी) कंपन्यांमध्ये देशातील पहिल्या पाच कंपन्यांमध्ये स्थान मिळविले असल्याचे ही त्यांनी सांगितले.
