पुण्यातील शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंदच – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे, दि. 21 – शहरात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांचा आकडा वाढतच असल्याने शहरातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी दिली.

याबाबत आयुक्तांशी चर्चा करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. दरम्यान 13 डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतल जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यशासनाने 9 वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थानी आपल्या पातळीवर निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले. त्यानुसार, हा निर्णय घेण्यात आला आहे.

पालकांशी चर्चा करुन आणि सद्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: