आपल्या लग्नाच्या खर्चामधून स्थलांतरित श्रमिकांसाठी अन्नदान केलेल्या पुण्यातील ऑटो रिक्षा चालकाचा समावेश भारत के महावीर मध्ये

पुणे -युनायटेड नेशन्स, इंडियाने आणि नीति आयोगाने डिस्कव्हरी चॅनलच्या भागीदारीसह सुरू केलेल्या भारत के महावीर ह्या तीन भागांच्या मालिकेचे सादरीकरण दिया मिर्झा व सोनू सूदद्वारा केले जात आहे व त्यामध्ये कोव्हिड- 19 पॅन्डेमिकच्या काळात गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या भारतातील 12 कर्तबगार व्यक्तींचा समावेश आहे.

अक्षय संजय कोठावळे हे पुण्यातील ऑटो रिक्षा चालक असून त्यांनी दररोज 400 श्रमिक कामगारांना पोषण दिले आहे आणि कठीण वेळेस त्यांना आश्रयही उपलब्ध करून दिला आहे. लॉकडाउनच्या काळात ते गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्तींना रुग्णालयातील तपासण्यांसाठी मोफत ऑटो रिक्षा सेवाही देत आहेत. ह्या उल्लेखनीय कामासाठी, अक्षय ह्यांनी त्यांच्या लग्नाच्या खर्चासाठीचा रू. 2 लाख खर्च केला आहे व त्यांना रू. 6 लाख इतकी देणगी मिळाली आहे व ह्या निधीचा वापर ते जास्तीत जास्त संख्येतील गरजू लोकांपर्यंत पोहचण्यासाठी करत आहेत.

अक्षय कोठावळे ह्यांनी म्हंटले, “हा प्रत्येकासाठीच बिकट काळ आहे. माणूस म्हणून गरज असलेल्या इतरांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे व ते माझे उद्दिष्ट होते. जेव्हा मी‌ बघितले की, इतक्या जास्त संख्येने लोकांही कामं गेली आणि ते घरीही जाऊ शकत नव्हते आणि इथे निर्वाह करण्याइतका पैसाही त्यांच्याकडे नव्हता, तेव्हा मी‌ पुढे यायचे ठरवले. ह्या स्थलांतरित श्रमिकांसाठी माझे अन्न व निवारा देण्यासाठी माझ्या लग्नासाठीच्या रकमेचा वापर करताना मी दोनदा विचारही केला नाही. मला इतरही अनेक लोकांना मदत करता यावी ह्यासाठी मला जेव्हा रू. 6 लाख देणगी देण्यात आली, तेव्हा मला अतिशय आनंद झाला.”

अभिनेता सोनू सूद ह्यांनी म्हंटले, “अक्षय कोठावळे आणि त्याच्या वधूने त्यांच्या लग्नासाठी पैसे साठवले होते; परंतु लॉकडाउनमुळे पुणे शहर बंद झाले, पुरवठे कमी झाले व भुकेले लोक अनेक झाले. अक्षय हे बघू शकले नाहीत आणि त्यांनी एक नागरिक म्हणून आपली भुमिका पार पाडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्यांचा वाटा निश्चितच उचललला. त्यांची ऑटो रिक्षा अशी वाहन बनली जिने अनेकांच्या चेह-यावर हसू आणले. ते जे म्हणतात ते खरे आहे- व्यक्तीकडे धाडस असले पाहिजे, कारण एका व्यक्तीच्या शक्तीनेही गोष्टी बदलू शकतात.”

भारत के महावीरमधील अन्य उल्लेखनीय उदाहरणांमध्ये 12 वर्षांची रिद्धी आहे जिने प्रोजेक्ट केअरो- ना (Care-ona) द्वारे ह्या पॅन्डेमिकमध्ये 2000 पेक्षा जास्त रेशन किटसचे वाटप केले व 11 लाखांपेक्षा अधिक निधी उपलब्ध केला. 85 वर्षांच्या सरोजा सुंदरराजन ह्या गणिताच्या शिक्षिकांनी क्रिएटीव्ह मॅथस शीटस विकून पीएम केअर्स निधीला रू. 2 लाख इतकी देणगी दिली. श्रीनी स्वामीनाथन ह्यांनी श्रमिक ट्रेन्समधून आपल्या गावी परतणा-या स्थलांतरित श्रमिकांना रू. 1 लाख 45 हजारांचे केअर पॅकेजेस दिले. इंदर सिंह यादव ह्या रेल्वे पोलिस अधिका-याने एका शिशूला दुध देण्यासाठी चालत्या ट्रेनच्या मागे धाव घेतली. त्यामध्ये दिल्लीतील सीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या लंगर ऑन व्हील्स ह्या उपक्रमाहाही समावेश आहे व ह्याद्वारे दररोज रस्त्यावर राहणा-या 1 लाख लोकांना अन्नदान दिले जात आहे. बंगळुरूचे शालेय विद्यार्थी‌ रोहन रे आणि आकाश राघवन ह्यांनी मुलांसाठी ऑनलाईन फिटनेस क्लब सुरू केला आणि आपली सर्व मिळकत व बचत कोव्हिड रिलीफसाठी दान केली. बंगळूर येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळुरूच्या 2000 सालच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थलांतरित श्रमिकांना आपल्या घरी पोहचता यावे म्हणून भारतभरामध्ये 10 चार्टर विमाने चालवली. ह्या शोमध्ये तृतीयपंथी अधिकार कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी ह्यांचाही समावेश आहे व त्या मे 2020 पासून ह्या समुदायासाठी दररोज 200 जेवणांचे वाटप करत आहेत. राजी राधाकृष्णन ह्या 31 वर्षांची विकलांग महिलेने फ्रंटलाईन कर्मचा-यांसाठी 2000 पेक्षा जास्त मास्कस शिवले. बाबा कर्नाईल सिंह खैरा ह्यांनी महाराष्ट्रातील एनएच-7 वरील त्यांच्या रस्त्यालगतच्या हॉटेलमधून 20 लाखांपेक्षा अधिक लोकांना मोफत जेवण दिले. भारत के महावीरमध्ये भारतातील वंचित जिल्ह्यांपैकी एक असलेल्या हरयानामधील मेवात जिल्ह्यामधील एक हृदयद्रावक कथेचाही समावेश आहे. इथे पूर्णपणे स्थानिकांद्वारे चालवले जाणारे एक कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे व त्याद्वारे कोव्हिड- 19 संदर्भात जागरूकता वाढवली जात आहे मुले शिकत राहतील, ह्याची खात्री घेतली जात आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: