बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन – भारती सिंहच्या मुंबईतील 3 घरांवर NCB ने मारले छापे

प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंहच्या घरावर NCB शनिवारी छापे टाकले आहेत. भारती आणि तिच्या पतीवर अमली पदार्थांचे सेवन केल्याचे आरोप आहेत. NCB ने या दोघांना समन सुद्धा जारी केला. एका अमली पदार्थ तस्कराच्या चौकशीत या दोघांची नावे समोर आली होती. त्यानंतर भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा येथील तिन्ही घरांवर रेड टाकण्यात आली. विशेष म्हणजे, या धाडीत NCB च्या टीमने अमली पदार्थ जप्त देखील केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच बॉलिवूडमध्ये ड्रग्सच्या तपासाला वेग आला. यामध्ये आतापर्यंत अनेक सिलेब्रिटींना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यामध्ये दीपिका पादुकोण आणि तिच्या मॅनेजरसह नावाजलेल्या कलाकारांचा समावेश होता. नुकतेच ड्रग्स प्रकरणात 20 नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपाल चौकशीसाठी NCB कार्यालयात पोहोचला होता. या ठिकाणी त्याची ड्रग्स प्रकरणात चौकशी करण्यात आली. अर्जुनसह त्याच्या सोबत लिव्ह इनमध्ये राहणारी गॅब्रिएला डेमेट्रिएड्स हिची दोन दिवस चौकशी झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: