कोल्हापूरचे जवान संग्राम पाटील देशासाठी शाहिद

कोल्हापूर, दि. 21 – पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरचे आणखी एक जवान शहीद झाले आहेत. कोल्हापूरचे संग्राम पाटील यांना रोजौरी येथे शत्रूशी लढताना संग्राम यांना विरमरण आले. कोल्हापूरातील निगवे खालसा येथे राहणारे रहिवासी होते. भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते.

संग्राम यांनी आपले बालणपण खूप हालाकीत काढले होते. संग्राम हे शेतकरी कुटुंबातील होते. त्यांचे आई वडील आजही शेतीची कामे करतात. संग्राम यांच्या सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांच्या घराची आर्थिक स्थिती सुधारली होती. इतके वर्षे संग्राम यांनी देश सेवा केली. पुढच्या सहा महिन्यात ते भारतीय सैन्यातून निवृत्त होणार होते. पण त्यांनी आपला प्राण भारतसेवेसाठी अर्पित केला. संग्राम यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच कोल्हापूरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उलळली आहे.

मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या कुरघोडी सुरूच आहेत. यात महाराष्ट्राने आपला आणखी एक पुत्र गमावला आहे. एकाच आठवड्यात कोल्हापूरमधील दोन जवानांना वीरमरण आले आहे. चार दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या बहिरेवाडी येथील अवघ्या 20 वर्षांचे जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे यांच्याही वीरमरण आले.

Leave a Reply

%d bloggers like this: