बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन – कॉमेडीयन भारती सिंहला NCB ने केली अटक

मुंबई कॉमेडियन भारती सिंगला एनसीबीने अटक केली आहे. तसेच तिचा नवरा हर्षची चौकशी सुरु आहे.गांजाचे सेवन करत असल्याची कबुली भारतीने दिली आहे.  एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघांवरही ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप आहे. ड्रग्जच्या पेडलर्सकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडियनच्या भारती सिंहच्या घरी एनसीबीने रेड टाकली होती. 

भारती सिंहच्या मुंबईमधील घरात मादक पदार्थ सापडल्याची माहिती पुढे येत आहे. एनसीबीने अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात धाड टाकली.

भारती सिंह अनेक शोमध्ये काम करलिवत आहे. एक कॉमेडियन म्हणून तिने तिची ओळख निर्माण केली आहे.

एनसीबीच्या कारवाईत आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांचं नाव पुढे आलं आहे. एनसीबी बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शनवर सध्या तपास करत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: