अपोलो हॉस्पिटल्स आणि टाटाएमडी चेक करणार कोविड-१९ तपासणी

पुणे, दि. 19 – आशियातील आघाडीचा एकात्मिक आरोग्यसेवा पुरवणारा समूह अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप आणि टाटा समूहाने आरोग्यसेवा क्षेत्रात नव्याने सुरु केलेली कंपनी टाटा मेडिकल अँड डायग्नॉस्टिक्स (टाटा एमडी) यांनी भागीदारीची घोषणा केली आहे.  टाटाएमडी चेक ही जगातील पहिली क्रिस्पर कॅस-९ वर आधारित डायग्नोस्टिक टेस्ट सादर करून देशभरात कोविड-१९ तपासण्या वाढवण्यात मदत करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे.

अपोलो हॉस्पिटल्स आपली उपकंपनी अपोलो डायग्नॉस्टिक्समार्फत एनसीआरमध्ये डिसेंबर २०२० च्या पहिल्या आठवड्यापासून टाटा एमडी चेक टेस्टिंग सुविधा उपलब्ध करवून देणार आहे आणि त्यानंतर लवकरच कोलकाता, मुंबई, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, अहमदाबाद व पुणे या सर्व महत्त्वाच्या शहरं मध्ये याचा प्रसार केला जाईल.  त्यापुढील टप्प्यात देशातील इतर शहरांमध्ये देखील ही तपासणी उपलब्ध होईल.

फेलूदा तंत्रज्ञानावर आधारित टाटाएमडी चेक ही जगातील पहिली कोविड१९ डायग्नॉस्टिक्स टेस्ट आहे जी डीएनए जेनोम एडिटिंग टूल क्रिस्पर कॅस-९ वर आधारित आहे.  फेलूदा डायग्नॉस्टिक्स टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म हा इन्स्टिटयूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटीव्ह बायोलॉजी (सीएसआयआर-आयजीआयबी) यांनी विकसित केला आहे.

टाटाएमडी चेकला भारतीय वैद्यकीय संशोधन आणि औषध महानियंत्रक संस्था अर्थात डीसीजीआयने मान्यता दिली आहे.  ही विषाणू आहे अथवा नाही हे तपासणारी टेस्ट असून उच्च अचूकता आणि तातडीने निष्कर्ष देण्याची क्षमता यामध्ये आहे.  देशात सर्वात प्रथम अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने ही तपासणी स्वीकारली आहे.     

अपोलो हॉस्पिटल्ससोबतच्या भागीदारीमुळे टाटाएमडी चेकच्या देशभरातील हॉस्पिटल्स, डायग्नॉस्टिक्स शृंखला आणि इतर आरोग्यसेवा सुविधा यासारख्या आरोग्यसेवा क्षेत्रातील संस्थांसोबत सहयोगाच्या प्रयत्नांना वेग मिळणार आहे.

पुढील काही आठवड्यात पहिल्या टप्प्यामध्ये अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप टाटाएमडी चेक टेस्टिंग सुविधा ८ रुग्णालयांमध्ये उपलब्ध करवून देणार आहे.  मागणीचा ओघ आणि इतर ठिकाणी विस्तार करण्याची गरज यांचा आवाका लक्षात घेऊन ठिकठिकाणी प्रमाण वाढवले जाईल.

या सर्व शहरांमधील प्राथमिक आरोग्यसेवा क्लिनिक्स आणि डायग्नॉस्टिक्स लॅब्स व कलेक्शन सेंटर्सचे अपोलो डायग्नॉस्टिक्सचे नेटवर्क या उपक्रमामध्ये नमुने गोळा करणे, रुग्णांच्या घरून नमुने आणणे आणि तपासणी यामध्ये मदत करणार आहे.

अपोलो हेल्थ अँड लाइफस्टाइल लिमिटेडच्या देशभरात पसरलेल्या नेटवर्कमध्ये १५ राज्यामध्ये मिळून १०० पेक्षा जास्त क्लिनिक्स, ७५ प्रयोगशाळा आणि ६०० पेक्षा जास्त कलेक्शन सेंटर्स आहेत.  रुग्णांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी आणि तपासणीची उपलब्धता वाढवण्याची गरज लक्षात घेऊन या नेटवर्कचा उपक्रमातील उपयोग वाढवला जाईल.  आजवर अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने २,५०,००० पेक्षा जास्त कोविड तपासण्या केल्या आहेत आणि ७५,००० पेक्षा जास्त कोविड-१९ रुग्णांवर उपचार केले आहेत.

अपोलो हॉस्पिटल्स आणि अपोलो डायग्नॉस्टिक्समधील महत्त्वाचे डायग्नॉस्टिक्स क्लिनिशियन्स आणि कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि प्रभावी टेस्टिंग नियमांचे प्रशिक्षण देण्यात टाटा एमडी मदत पुरवेल.  हे प्रशिक्षण पुढील काही आठवड्यात दिले जाईल.  टाटाएमडी चेकमध्ये मुळातच अनेक लाभदायक वैशिष्ट्ये असल्यामुळे या तपासणीतून अधिक जलद गतीने परिणाम हाती येतील अशी अपेक्षा आहे.  तसेच यामध्ये किमान बॅच आकाराची मर्यादा नसल्यामुळे तपासण्यांची संख्या क्षमता देखील वाढेल.  सेन्सर्सचा वापर करून कीट्सच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवले जाईल.  त्याचप्रमाणे एआयवर आधारित रिझल्ट कॅप्चर व अनालिसिस टूलमुळे प्रयोगशाळांना इमेज-बेस्ड परिणाम मिळतील, नमुने कुठून आले, कुठे पोहोचवले गेले अशी संपूर्ण माहिती उपलब्ध होईल आणि तपासणीचे परिणाम कुठूनही पाहता येतील.  यामुळे रुग्णांना या तपासणीमधून अधिक सुविधाजनक अनुभव मिळवता येईल.

या उपक्रमाबद्दल माहिती देताना अपोलो हॉस्पिटल्सच्या (एएचईएल) जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर व अपोलो हेल्थ अँड लाइफस्टाइल लिमिटेडच्या (एएचएलएल) मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. संगीता रेड्डी यांनी सांगितले, “तपासण्याच्या ताफ्यामध्ये टाटाएमडी चेकचा समावेश झाल्यामुळे देशात वैश्विक महामारीच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईला अधिक जास्त बळ प्राप्त झाले आहे.  कोविड टेस्टिंग क्षेत्रातील क्रांतिकारी सुधारणा बनण्याची क्षमता असलेल्या या उपक्रमांत टाटा ग्रुपसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे  आरोग्यसेवा क्षेत्रात नवनवीन उपक्रम आणण्यात, रुग्णांची काळजी, तपासणी आणि आजारांना प्रतिबंध यासाठी नवी तंत्रज्ञाने आणण्यात अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप नेहमीच आघाडीवर असतो.  कोविड टेस्टिंग क्षेत्रात नवी दिशा खुली करवून देणाऱ्या, देशात विकसित करण्यात आलेल्या तपासणीला लॉन्च पॅड पुरवत असताना ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानातही आम्ही योगदान देत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. अपोलो २४/७ ऍप डाउनलोड करून   तपासणीसाठी कुठूनही, कधीही बुकिंग करता येईल तसेच फक्त २ तासात रिपोर्ट्स देखील मिळवता येतील.” 

टाटा मेडिकल अँड डायग्नॉस्टिक्सचे सीईओ व एमडी गिरीश कृष्णमूर्ती यांनी सांगितले, “भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रात प्रवर्तक म्हणून नावाजल्या जाणाऱ्या आणि आपले आघाडीचे स्थान कायम राखून असलेल्या अपोलो हॉस्पिटल्ससोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  वैश्विक महामारीच्या विरोधात देशात सुरु असलेल्या लढाईमध्ये अपोलो हॉस्पिटल्सने विविध पातळ्यांवर आपले योगदान दिले आहे.  यामध्ये प्रतिबंधात्मक प्रयत्न, मोठ्या प्रमाणावर तपासण्या आणि सर्वसमावेशक काळजी यांचा समावेश आहे.  आम्ही असे मानतो की, अपोलो हॉस्पिटल्ससोबत भागीदारीमुळे प्रभावी आणि अधिक जास्त प्राधान्य दिला जाणारा तपासणी पर्याय म्हणून टाटाएमडी चेकला स्वीकारले जाण्याला गती प्राप्त होईल.  आज आपण सर्वजण आपले सर्वसामान्य जीवन पुन्हा सुरु करत आहोत तेव्हा ही सुविधा अतिशय लाभदायक ठरेल.”

Leave a Reply

%d bloggers like this: