एल अँड टीतर्फे गंगान्यान मिशनसाठी भारतातील पहिल्या लाँच हार्डवेअरचे वितरण

मुंबई,दि. 17 – लार्सन अँड टुब्रो या भारतातील आघाडीच्या अभियांत्रिकीखरेदी आणि बांधकाम प्रकल्प, उत्पादनसंरक्षण आणि सेवा समूहाने इस्त्रोला त्यांच्या गंगान्यान लाँच व्हेइकलसाठी पहिले हार्डवेयरबूस्टर सेगमेंट वितरित केले आहे. वेळेआधीच करण्यात आलेल्या या वितरणासाठीच्या फ्लॅग ऑफ समारंभासाठी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (इस्त्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन प्रमुखपदी उपस्थित होते.

कोव्हिड- 19 मुळे विविध मर्यादा असतनाही जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या सॉलिड प्रोपेलंट रॉकेट बूस्टर- एस- 200चा मध्य भाग वेळेआधीच आणि निर्दोषपणे पुरवण्यात आला. भारतातील या पहिल्या मानवसहित मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या या सेगमेंटची निर्मिती एल अँड टीच्या पवई एयरोस्पेस उत्पादन केंद्रात दर्जाशी संबंधित सर्व प्रकारचे निकष तसेच वेळेच्या मर्यादेचे पालन करून करण्यात आली.

इस्त्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाइट प्रोग्रॅमसाठी (एचएसएफपी) आवश्यक पाठिंबा देण्यात एल अँड टी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या पाच दशकांपासून इस्त्रोची विश्वासार्ह साथीदार असलेल्या एल अँड टीने इस्त्रोच्या चांद्रयान आणि मंगलयानसह प्रत्येक मोहिमेसाठी विविध प्रकारच्या हार्डवेयरची निर्मिती केली आहे.

3.2 मीटर्सचे डायामीटर, 8.5 मीटर उंची आणि 5.5 टन वजन असलेल्या या महत्त्वाच्या बूस्टर सेगमेंटला एका व्हर्च्युअल कार्यक्रमात इस्रोच्या अवकाश विभागाचे सचिव डॉ. के. सिवन आणि एल अँड टी संचालक मंडळाचे सदस्य व पूर्णवेळ संचालक श्री. जयंत पाटील यांनी एकत्रितपणे झेंडा दाखवला. या समारंभासाठी डॉ. एस. सोमनाथ, संचालक व्हीएसएससी, डॉ. व्ही आर ललिथाम्बिका, संचालक डीएचएसपी आणि डॉ. एस उन्नीकृष्णन नायर, संचालक एचएसएफसी, इस्त्रो लॅब्जसह वैज्ञानिक समाजाचे सदस्य आणि लार्सन अँड टुब्रोचे सदस्य उपस्थित होते.

या वितरणाला राष्ट्राला मिळालेल्या दिवाळीच्या भेटीची उपमा देत इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी इस्त्रो व एल अँड टीच्या टीम्सचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘दोन्ही टीम्सनी फ्लाइट हार्डवेयरचे काम वेळेआधीच पूर्ण करण्यासाठी अविरतपणे काम केले असून त्याचवेळेस ह्युमन स्पेस फ्लाइट मिशनसाठी आवश्यक उच्च दर्जा राखण्यात यश मिळवले आहे.’

एल अँड टीचे पूर्णवेळ संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपाध्यक्ष (संरक्षण आणि स्मार्ट तंत्रज्ञान) श्री. जे डी पाटील म्हणाले, ‘ या अतिशय महत्त्वाच्या अवकाश मोहिमेसाठी इस्त्रोने आमच्यावर विश्वास दाखवल्याचा अभिमान वाटतो. या कामासाठी एल अँड टी मधील सर्वोत्तम अभियांत्रिकी गुणवत्ता आणि कौशल्य इस्त्रोसारख्या आमच्या पाच दशकांपासूनच्या साथीदाराची तंत्रज्ञानविषयक आव्हाने पूर्ण करण्यासाठी गुंतली होती. आम्हाला खात्री आहे, की इस्त्रोचे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ राष्ट्राच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करतील.’

ह्युमन स्पेस मिशन – जीएसएलव्ही एमके थ्री लाँचर जे इस्त्रोचे हेवी- लिफ्ट लाँचर असून त्याची अवजड वजन उचलण्याची क्षमता लक्षात घेऊन ते गंगान्यान मोहिमेसाठी इच्छित एलिप्टिकल ऑर्बिटमधे ऑर्बिटर मोडयूल लाँच करण्यासाठी वापरले जाणार आहे. एस- 200 या लाँच व्हेइकलसाठी सॉलिड प्रोपेलंट बूस्टरचा भाग आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: