विविधरंगी पणत्यांच्या प्रतिकृतींनी सजले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे दिपावली निमित्त मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली. विविधरंगी पणत्यांच्या भव्य प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने पाडव्यापासून मंदिरे खुले करण्याच्या दिलेल्या निर्णयाचे स्वागत असून भक्तांच्या स्वागतासाठी मंदिर सज्ज असणार आहे. 
दिवाळीनिमित्त मंदिरावर १०८ विविधरंगी भव्य पणत्या, २१ झुंबरे लावण्यात आली आहेत. तसेच संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे. मंदिराच्या दरवाज्यावर व संपूर्ण संरक्षण भिंतीवर फुलांची आकर्षक आरास व तोरण देखील लावण्यात आले आहे. 
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्र शासनाने पाडव्यापासून मंदिरे व सर्व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली करण्याची परवानगी दिल्याने आम्ही सोमवारपासून भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहोत.  शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतची मंदिर प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. मास्क, सॅनिटायझेशन व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवेश दिला जाणार आहे. तसेच सभामंडपात बसण्याची परवानगी देण्यात येणार नाही. शासनाने दिलेल्या निर्णयामुळे भक्तांचा पाडवा गोड झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: