केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नसून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.
माझ्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. कोरोनाची साथ नव्यानेच आली होती तेव्हा गो कोरोना कोरोना गो अशी घोषणा दिल्याने रामदास आठवले हे चांगलेच चर्चेत आले होते. मुंबईतील नरीमन पॉईंट या ठिकाणी त्यांनी या घोषणा त्यावेळी दिल्या होत्या. आता रामदास आठवलेंना कोरोनाने गाठलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ते खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
