होंडातर्फे 800 वा एफआयएम वर्ल्ड चॅम्पियनशीप ग्रँड प्रिक्स विजय साकार

पुणे, दि. 26 – होंडा मोटो3 रायडर जॉमे मासिया (लेपर्ड रेसिंग NSF250RW) यांनी स्पेनमधील मोटरलँड अरागॉन येथे झालेल्या 2020 एफआयएम*वर्ल्ड चॅम्पियनशीप ग्रँड प्रिक्समधील मोटो3 क्लासच्या 12 व्या फेरीत विजय मिळवला आहे. 1961 मधे स्पॅनिश ग्रँड प्रिक्सच्या 125 सीसी क्लाससह पहिल्यांदा वर्ल्ड ग्रँड प्रिक्सची सुरुवात करणाऱ्या होंडाने आता 800*2 ग्रँड प्रिक्स साकार केला.

*1 एफआयएम: फेडरेशन इंटरनेशनल डी मोटोसायक्लिझ्म

*2 एफआयएम रेकॉर्ड्सवर आधारित होंडाने मोजलेले विजय

2010- 2018 दरम्यानचे मोटो2 क्लास विजय यात समाविष्ट करण्यात आलेले नाहीत, कारण संपूर्ण क्लासच्या रेसिंगसाठी होंडा इंजिन्स वापरण्यात आली होती.

2012 मधील मोटो क्लास विजय होंडाचे विजय म्हणून यात समाविष्ट करण्यात आलेले नाही, कारण त्यावेळेस नोंदणीकृत कन्स्ट्रक्टर एफटीआर होंडा (अर्थात पॉवर्ड बाय NSF250R इंजिन) होते.

टॉम फिलिस यांनी आरसी 143 द्वारे होंडाला मिळवून दिला पहिला विजय   जॉमे मासिया आणि त्यांच्या NSF250RW ने होंडाला मिळवून दिला 800 वा विजय

1954 मधे होंडाचे संस्थापक सोईचिरो होंडा यांनी त्याकाळी प्रीमियर मोटर स्पोर्ट्स असलेल्या आयल ऑफ मॅन टीटीमधे प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. ‘जगातील सर्वोत्तम बनण्याचे’ ध्येय त्यामागे होते. पाच वर्ष रेसिंग मशिन विकसित केल्यानंतर होंडा ही आयल ऑफ मॅन टीटी रेसमधे सहभागी झालेली पहिली जपानी मोटरसायकल उत्पादक ठरली. त्यानंतरच्या वर्षात म्हणजेच 1960 मधे होंडाने एफआयएम रोड रेसिंग वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या 125 सीसी आणि 250 सीसी क्लासमधे स्पर्धा करण्यास सुरुवात केली. 1661 मधे टॉम फिलिस यांनी सीझनच्या सुरुवातीलाच स्पॅनिश ग्रँड प्रिक्स जिंकत होंडाला पहिला विजय मिळवून दिला. त्यानंतर होंडाने 1962 मधे 50 आणि 350 सीसी क्लासेसमधेही प्रवेश केला व त्यानंतर 1966 मधे 500 सीसी क्लासमधे पर्दापण केले. 1966 मधे होंडाने सर्व 5 क्लासेसमधे विजय संपादन केला. 1967 चा सीझन संपल्यानंतर होंडाने फॅक्टरी रेसिंग अक्टिव्हिटी थांबवल्या आणि 11 वर्षांनंतर पुनर्प्रारंभ करेपर्यंत होंडाकडे 138 ग्रँड प्रिक्स विजय जमा झाले होते.

1979 मधे होंडाने 500 सीसी क्लासपासून सुरुवात करत एफआयएम रोड रेसिंग वर्ल्ड चॅम्पियनशीप रेसिंगमधे पुनरागमन केले. त्यानंतर तीन वर्षांनी 1982 मधे अमेरिकन रायडर फ्रेडी स्पेन्सर यांनी आपल्या होंडा NS500 वर बेल्जियमधे सातवी फेरी जिंकत वर्ल्ड ग्रँ प्रिक्समधे परतल्यापासूनचा पहिला विजय कंपनीला मिळवून दिला. होंडाने त्यानंतर 125 सीसी आणि 250 सीसी क्लासेसमधी ग्रँड प्रिक्स रेसेस जिंकल्या.

परिणामी 2001 मधे इटालियन व्हॅलेंटिनो रोस्सी यांनी जपान ग्रँड प्रिक्सच्या शुभारंभालाच 500 सीसी क्लासमधे विजय मिळवत होंडाला 500 वा विजय मिळवून दिला. 2015 मधे मार्क मार्क्वेझ यांनी अमेरिकेतील इंडियाना येथील इंडियनापोलिस मोटर स्पीडवेच्या मोटोजीपी क्लासच्या 10 व्या राउंडमधे आपल्या होंडा RC213V वर स्वार होऊन चेकर्ड फ्लॅग घेत होंडाला 700 वा ग्रँड प्रिक्स विजय मिळवून दिला.

होंडा मोटर कं. लि. चे अध्यक्ष आणि प्रतिनिधी संचालक ताकाहिरो हाचिगो म्हणाले, ‘मला होंडाच्या 800 व्या एफआयएम वर्ल्ड चॅम्पियनशीप ग्रँड प्रिक्स  विजयाचा अभिमान वाटतो. जगभरातील होंडा चाहत्यांनी होंडाच्या रेसिंग उपक्रमांना दिलेल्या योगदानाबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. त्याचप्रमाणे 1959 पासून आजतागायत आपल्या पॅशन आणि चिकाटीने सर्व समस्यांवर मात करत कंपनीला इथपर्यंत पोहोचवल्याबद्द्ल मी त्यांचा आभारी आहे. होंडासाठी हा क्षण पुढच्या वाटचालीची खूण असून यापुढेही आम्ही अशाचप्रकारे विजयासाठी संघर्ष करत राहू. आम्हाला तुमच्या अशाचप्रकारच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याची उत्सुकता आहे. ’

Leave a Reply

%d bloggers like this: