ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा


नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर (Australia Tour) जाणाऱ्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी बीसीसीआयने एकूण 32 खेळाडूंची निवड केली आहे. आयपीएल 2020 च्या समारोपानंतर सर्व खेळाडू एकाच वेळी युएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. बीसीसीआयने तिन्ही फॉर्मेटसाठी संघांची घोषणा केली. तिन्ही फॉर्मेटमध्ये विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असेल. सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने त्यांच्या कार्यकाळात प्रथमच संघाची निवड केली आहे.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यासाठी अखिल भारतीय ज्येष्ठ निवड समितीची सोमवारी व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय तर, 4 कसोटी सामने खेळणार आहेत. या दौऱ्यावर भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्मा संघाबाहेर आहे. तसेच आयपीएलच्या अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

भारतीय टी-20 क्रिकेट संघ-

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती

भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघ-

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

भारतीय कसोटी क्रिकेट संघ-

विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज

भारतीय क्रिकेट संघ ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या दौऱ्यात बदल करण्यात आला होता. ज्यावेळी टी-20 विश्वचषक 2020 रद्द करण्यात आले होते. तेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबरमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचे वेळापत्रक होते. सुरुवातीला टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर कसोटी सामना खेळला जाणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: