‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’चा नवरात्र व दसरा यांदरम्यान 550 नवीन मोटारी वितरणाचा विक्रम; उत्सवी हंगामात मजबूत कामगिरी

पुणे, दि. 26 – नवरात्र व दसरा या सणांच्या काळात शुभ मुहूर्त साधून ‘मर्सिडीज’च्या गाड्यांचे विक्रमी प्रमाणात वितरण ग्राहकांना करण्यात आले, असे ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’ या कंपनीने आज घोषित केले. ‘थ्री पॉंईंटेड स्टार’ असलेल्या या ब्रॅंडने ‘मर्सिडीज बेंझ’च्या 550 गाड्या देशभरातील विविध ग्राहकांना सणासुदीच्या दिवसांत सुपूर्द केल्या. 2019 मधील नवरात्र व दसऱ्याच्या दिवसांमध्ये झालेल्या विक्रमाच्या बरोबरीने ही कामगिरी झाली. 

2020 मधील नवरात्र  दसऱ्याच्या वितरणामुळे सणासुदीतील विक्रीच्या परंपरेचे जोरदार पुनरागमन

दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि गुजरातसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची जोरदार मागणी वाढली असून परिस्थिती पुन्हा सामान्य होऊ लागली असल्याचे दिसून येत आहे. टाळेबंदी संपून व्यवसाय स्थिर व्हावेत, ही आकांक्षा सर्वच थरांतील नागरिकांमध्ये आहे असेही दिसते. ‘मर्सिडीज-बेंझ’च्या आकर्षक उत्पादनांच्या पोर्टफोलिओमुळेही ग्राहकांचा आत्मविश्वास वाढला आहे. नवनव्या उत्पादनांमुळे हा पोर्टफोलिओ सुधारत चालला आहे. नाविन्यपूर्ण अशा वित्तपुरवठा योजना आणि विविध सवलती यांची भर पडल्याने ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेहून अधिक मूल्य मिळू लागले आहे.

दिल्ली-एनसीआर, मुंबई, गुजरात आणि उत्तरेकडील अन्य शहरांमध्ये 550 गाड्यांचे विक्रमी वितरण यंदा झाले. एकट्या ‘दिल्ली-एनसीआर’मध्ये 175 नवीन मर्सिडीज-बेंझ कार त्यांच्या मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या. कोरोनाचे संकट असतानाही 2020 मधील तिसऱ्या तिमाहीतील प्रत्येक महिन्यात ‘मर्सिडीज-बेंझ’च्या विक्रीमध्ये अनुक्रमे वाढ होत गेलेली आहे.

या विषयावर बोलताना ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेन्क म्हणाले, “यावर्षी सणासुदीत जोरदार विक्री होऊन उत्साहाला सुरुवात झाली आहे. ग्राहकांच्या या सकारात्मकतेचा आम्हाला आनंद आहे. या उत्सवाच्या काळात मर्सिडीज घरी नेणाऱ्या आमच्या ग्राहकांच्या आकांक्षा व उत्सव साजरा करण्याची मानसिकता या बाबी ‘’अनलॉक’’ झाल्याने आम्हाला समाधान लाभत आहे. गाड्या वितरीत होण्याची आकडेवारी पाहता आम्हाला यंदाच्या हंगामाबद्दल आत्मविश्वास वाटू लागला आहे. तसेच, लक्झरी गाड्या घेणाऱ्या ग्राहकांची निष्ठा व भरवसा मर्सिडीज-बेंझ या ब्रॅंडवर व तिच्या उत्पादनांवर आहे, हे यातून अधोरेखित होते. अनेक आव्हाने असलेल्या सध्याच्या बाजाराच्या परिस्थितीच्या संदर्भात, या ग्राहकांचा ‘मर्सिडीज’वरील हा विश्वास अधिकच महत्त्वपूर्ण ठरतो.”

“आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा व्यवस्थित ऐकून घेतो. त्यांच्या या गरजाच आमच्या सर्व उपक्रमांच्या केंद्रस्थानी असतात. आमच्या ग्राहक-केंद्रित धोरणांना फळे आली आणि आमच्या ब्रँडला सकारात्मक गती मिळाली, याचा आनंद आहे. या उत्सवाच्या काळात व संपूर्ण तिमाहीत हीच गती कायम राहील, असा आम्हाला विश्वास आहे. पुढील तिमाहीत आम्ही आणखी नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करणार आहोत. त्यामुळे बाजारपेठेत रोमांचकता टिकून राहणार आहे. उर्वरित वर्षात विक्रीची कसर भरून काढण्याचे आमचे प्रयत्न राहतील,” असेही श्वेन्क यांनी नमूद केले.

Leave a Reply

%d bloggers like this: