fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

श्री महालक्ष्मी मंदिरात कोरोना योद्धयांच्या हस्ते सप्तशती महायज्ञ

पुणे : कोरोना महामारीचे संकट समूळ नष्ट व्हावे आणि प्रत्येक घटकातील व्यक्तीला आरोग्य व आर्थिक स्थैर्य लाभावे, याकरीता सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात कोरोना योद्धयांच्या हस्ते सप्तशती महायज्ञ करण्यात आला. कोरोनाच्या काळात वैद्यकीय सेवांमध्ये आघाडीवर असलेले डॉक्टर व परिचारिका तसेच अहोरात्र बंदोबस्तास सज्ज असलेले पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते हा यज्ञ पार पडला.  
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी यावेळी ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, नगरसेवक प्रविण चोरबोले, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, हेमंत अर्नाळकर, तृप्ती अग्रवाल आदी उपस्थित होते. मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. 
श्री महालक्ष्मी देवीसमोर दररोज विविध फळांचा नैवेद्य दाखविण्यात येत आहे. आज मोसंबीच्या ५ हजार फळांचा नैवेद्य देवीला दाखविण्यात आला. दररोज सुमारे २५०० ते ५००० वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य दाखविण्यात येत असून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, बुधराणी हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, गरवारे कोविड सेंटर, कमला नेहरु हॉस्पिटल, नायडू हॉस्पिटल, नगर रस्त्यावरील कोविड सेंटर येथील रुग्ण, डॉक्टर्स व आरोग्यसेवा कर्मचा-यांना प्रसाद देण्यात आला. यापूर्वी जंबो कोविड सेंटर शिवाजीनगर, सारसबाग येथील सणस मैदानावरील कोविड सेंटर, कोंढवा कोविड सेंटर, गंगाधाम येथील कोविड सेंटर, ससून हॉस्पिटल कोविड सेंटर आदी ठिकाणी फळे पाठविण्यात आली आहेत. 
ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, कोरोनाचे संकट दूर व्हावे, याकरीता कोरोना योद्ध्यांच्या हस्ते हा महायज्ञ करण्यात आला. कोरोनाच्या काळात या घटकांनी मोठे काम केले असून त्यांचा सन्मान करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ट्रस्टतर्फे धार्मिक कार्यक्रम सुरु असून विविध सामाजिक उपक्रमांवर देखील भर देण्यात येत आहे. यंदाचा उत्सवाचा खर्च कोरोनाकाळात सेवा दिलेल्या व समाजातील गरजू घटकांसाठी करण्यात येत आहे. तसेच श्री महालक्ष्मी माता, श्री महासरस्वती माता व श्री महाकाली माता यांच्या चरणी कोरोना महामारीचे  संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना करण्यात येत आहे. मंदिर बंद असून श्री महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org वरुन तसेच फेसबुक पेज  व  युट्यूब तसेच स्थानिक केबलवर भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading