पुण्यातील कलाकार सई परांजपे यांचा ‘लहेजा ‘ उपक्रम पोचला अजमेर, बंगळुरू, ऑस्ट्रेलियात !

पुणे : नवरात्रात नऊ रंगांत  स्वतःला वस्त्रे परिधान करण्याच्या   काळात आता घरच्या, मंदिरातील देवदेवतांना कलाकुसरीची देखणी वस्त्रे हौसेने करवून घेण्याकडे  भक्त मंडळींचा,मंदिरांचा  कल असून पुण्यातील कलाकार सई परांजपे यांचा हा अभिनव छंद पुण्यातून, अजमेर, बंगळुरू आणि ऑस्ट्रेलियापर्यंत  पोचला आहे.

दसऱ्यासाठी देवतांच्या  मूर्तीना कलाकुसरीच्या वस्त्रांचा साज करण्याची लगबग पुण्यात सुरु असल्याची माहिती ‘ लहेजा ‘ संस्थेच्या प्रमुख सई परांजपे यांनी दिली.

देवदेवतांना कलाकुसरीची महावस्त्रे 
 छंद म्हणून कॉश्चुम डिझायनिंग करणाऱ्या सई परांजपे देवदेवतांना कलाकुसरीची महावस्त्रे करण्याच्या संकल्पनेकडे वळल्या. आणि नवरात्रीत हा उपक्रम पुण्यापासून ,अजमेर ,बंगळुरू आणि ऑस्ट्रेलिया पर्यंत  घरोघरी पोचला.

सई परांजपे  या देवतांच्या मूर्तीसाठी उपरणे, साडी,शालू,शेला,पितांबर ,फेटा , बैठकीचे वस्त्र तयार करतात. त्यात पारंपारिक थाट कायम ठेऊन नवी कलाकुसर आणणात. अनेक मंदिरं, घरच्या देवतांसाठी ही डिझायनर वस्त्रे,महावस्त्रे  त्यांच्याकडून घेतली जातात.
वस्त्रे ,महावस्त्रे -अलंकार 
‘प्रत्येक मूर्तीच्या उंची -आकारानुसार वस्त्रे तयार करणे हे अत्यंत कलाकुसरीचे आणि आव्हानात्मक काम आहे.महाराष्ट्रातील गौरायांना पेशवाई थाटाची नऊवारी तयार करता येते . राजस्थानातील अजमेर येथील देवीसाठी घागरा -चोली तयार करण्यात आली . कृष्ण ,साईबाबा तसेच गणपतीच्या मूर्तीला फेटा मागितला जातो . वस्त्रे ,महावस्त्रे या बरोबरच देवतांच्या मूर्तीला दागिन्यांची विचारणा झाल्यास आम्ही श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स ची मदत घेऊन ते काम पूर्ण करतो .
 मखर ,दरवाजा ,मुकुट ,हार ,जानवे ,कंठी हार ,तोडे ,गोठ ,बाजूबंद ,पाटल्या ,कंबर पट्टा,मंगळसूत्र ,सोनसाखळी  असे अलंकार  करण्याकडे भक्तांचा .मंदिरांचा कल असतो  ‘,असे  पूजा नगरकर -कुलकर्णी  यांनी सांगितले. 

Leave a Reply

%d bloggers like this: