‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत  विद्यार्थ्यांना मार्गदर्शक कार्यक्रम 

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए.रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च मध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या राज्य शासनाच्या मोहिमेअंतर्गत कोविड-१९ साथ नियंत्रणासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक कार्यक्रम घेण्यात आला.

 कोविड-१९ साथ नियंत्रणासाठी मास्क वापरणे,हात स्वच्छ धुणे,शारीरिक अंतर राखणे इत्यादी त्रिसूत्रींचा वापर करणे जरुरी आहे.या त्रिसूत्रींद्वारे जनजागृती करण्याकरिता दिनांक २४ ऑक्टोबर २०२० रोजी झेड. व्ही. एम. युनानी मेडिकल कॉलेजच्या तज्ज्ञ डॉ.फरहा रिझवान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कॉलेजच्या प्राचार्या डॉ.अनिता फ्रान्झ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रा.पुनीत बसन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: