सणासुदीच्या निमित्ताने पुण्यातील निवासी स्थावर मालमत्तेच्या मागणीत वाढ

 Magicbricks PropIndex report Q3 मध्ये जाहीर

पुणे, दि. 24 – जूनच्या मध्यापासून लॉकडाउन हळूहळू कमी व्हायला लागल्यानंतर पुण्याच्या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मागणी सप्टेंबर 2020 मधे संपलेल्या तिमाहीअखेरीस वाढली आहे. दुसऱ्या तिमाहीमधे एकंदर 40 टक्क्यांनी घटलेला एकंदर मालमत्ता शोध चौथ्या तिमाहीत 35 टक्क्यांनी वाढला असून आहे. इतकेच नाही, तर Magicbricks Propindex Report Q3 2020.नुसार पुणे बाजारपेठेतील मागणी कोविड- पूर्व काळापेक्षाही जास्त चांगली आहे.

PropIndex अहवालानुसार राहायला जाण्यासाठी तयार असलेल्या मालमत्तांना पसंती वाढत असून त्यामुळे तिमाही पातळीवर होणाऱ्या किंमतीतील घट थांबली आहे आणि बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्प क्षेत्रात तिमाही पातळीवर किंमतीमधे किंचित वाढ झाली आहे.

PropIndex  अहवालाविषयी मऐजिकब्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पै म्हणाले, ‘पुढील 6 ते 8 महिने निवासी गृहक्षेत्राच्या पुनरूज्जीवनासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. ही महामारी आणि लॉकडाउनमुळे ग्राहकांची पसंत बदलली आहे. आता परवडणाऱ्या घरांना जास्त मागणी असून घर खरेदीदारांनी त्यांचे बजेट कमी केले आहे, मात्र बीएचके किंवा आकाराशी संबंधित त्यांच्या मागण्या बदललेल्या नाहीत. ते आजूबाजूच्या चौफेर परिसरात स्थलांतर करण्यास तयार आहेत. सणासुदीचा काळ जवळ येत असतानाच मागणीमधे चांगली वाढ दिसून येत असून जुलै ते सप्टेंबर तिमाहीदरम्यान किंमती स्थिर राहिल्या आहेत. हे या उद्योगासाठी चांगले लक्षण आहे आणि आम्हाला आशआ आहे, की ग्राहकांची खरेदीची मानसिकता सुधारेल व येत्या तिमाहींमधे त्याचे व्यवहारांत रुपांतर होईल.’

पुणे हे र्वात प्रगल्भ स्थावर मालमत्ता बाजारपेठांपैकी एक असून वेगवेगळ्या किंमती आणि आकाराच्या मागण्या व पुरवठा यांच्यात सुसंगती दिसून येत आहे. पुण्यातील मालमत्ता शोधामधे रु. 5000 ते रू. 7500 प्रती चौरस फुटांदरम्यानच्या 2बीएचके घरांचे वर्चस्व कायम आहे. मॅजिकब्रिक्स प्रॉपइंडेक्सनुसार 5000 ते 7500 चौरस फुट दर असलेल्या हडपसर, बाणेर, कोंढावा, वाकड आणि पिंपळे सौदागर अशा आयटी/आयटीईएस उद्योगांचे अस्तित्व लाभलेल्या ठिकाणांना मागणी आहे. त्याचबरोबर आयटी क्षेत्रही आर्थिक विवंचनेतून सावरत असताना व ‘मेड इन महाराष्ट्र’ कॅम्पेनमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळत असल्यामुळे या परिसरांतील निवासी प्रकल्पांचा ओघ वाढेल अशी अपेक्षा आहे.

आगामी नव्या पुणे विमानतळामुळे सासवड, उरुळी कांचन, लोणी काळभोर आणि फुरसुंगी अशा ठिकाणच्या घरांना मागणी वाढत आहे. दीर्घ काळात प्रस्तावित पुणे नाशिक सेमी हाय- स्पीड रेल कॉरिडॉरमुळे दिघी, तळेगाव, येरवडा आणि हडपसर येथील नासी विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: